AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रद्धा कपूर हिची ‘ही’ खास गोष्ट चोरीला, अभिनेत्रीने शेअर केला थेट चोराचा व्हिडीओ

श्रद्धा कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. श्रद्धा कपूर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.

श्रद्धा कपूर हिची 'ही' खास गोष्ट चोरीला, अभिनेत्रीने शेअर केला थेट चोराचा व्हिडीओ
| Updated on: Nov 26, 2023 | 7:11 AM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. नुकताच श्रद्धा कपूर हिने इंस्टा स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमुळे सध्या ती चर्चेत आहे. नुकताच श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी झालीये. याबद्दलच बोलतना या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर ही दिसत आहे. आता श्रद्धा कपूर हिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. विशेष म्हणजे श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी ही कोणत्याही माणसाने केली नाहीये, चक्क प्राण्याने ही चोरी केलीये. श्रद्धा कपूर हिच्या साहित्याची चोरी चक्क माकडाने केल्याचे सांगताना श्रद्धा कपूर ही दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात नेमके घडले तरी काय…

श्रद्धा कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. श्रद्धा कपूर हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे. याच माकडाने श्रद्धा कपूर हिचे स्नॅक्स चोरी केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना श्रद्धा कपूर हिने एक अत्यंत खास असे कॅप्शन देखील शेअर केल्याचे बघायला मिळतंय. लोकांना श्रद्धा कपूर हिने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच आवडलाय.

श्रद्धा कपूर हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, तूच चोरले आहेस माझे भाकरवडीचे पॅकेट…आता दुसरे काहीही चोरू नकोस…माकड…विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ते माकड स्पष्टपणे दिसत आहे. श्रद्धा कपूर हिने दिवाळीला मोठी खरेदी केली. चक्क कोट्यवधी रूपये किंमत असलेली गाडी ही श्रद्धा कपूर हिने खरेदी केली. आपल्या नव्या गाडीची झलक श्रद्धा कपूर हिने चाहत्यांना दाखवली.

श्रद्धा कपूर ही सध्या तिचा आगामी चित्रपट स्त्री 2 मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाची शूटिंग ही जुलैमध्ये सुरू होणार आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धा कपूर हिने माहिती शेअर केली होती. चाहते हे श्रद्धा कपूर हिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्यासोबत धमाका करताना श्रद्धा कपूर ही दिसली.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे दिसले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच यांची जोडी काम करताना दिसली. यामुळेच निर्मात्यांना तू झूठी मैं मक्कार चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. मात्र, म्हणावा तशा धमाका करण्यात या चित्रपटाला अजिबातच यश मिळाले नाही. लोकांनी फार जास्त तू झूठी मैं मक्कार चित्रपटाला प्रेम दिले नाही.

Follow Us
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत
'विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही'
विलास घुले हत्या प्रकरणाशी कुटुंबाचा संबंध नाही; बजरंग सोनवणे यांचा दावा, सीडीआर पुराव्यासाठी आव्हान
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध
रिक्षाचालकांवरील मराठी सक्तीला राष्ट्रवादीचा विरोध; पारसनाथ तिवारी न्यायालयात जाणार.
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
झारखंड विद्यार्थी आंदोलनाचे यश. कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा