Video: शक्ती कपूरला घेऊन लेक श्रद्धा पोहोचली रुग्णालयात, फोटोग्राफरवर संतापली! नेमकं काय झालं?

Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा वडील शक्ती कपूर यांच्यासोबत रुग्णालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नेमंक काय झालं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Video: शक्ती कपूरला घेऊन लेक श्रद्धा पोहोचली रुग्णालयात, फोटोग्राफरवर संतापली! नेमकं काय झालं?
Shradha Kapoor
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 02, 2026 | 7:43 PM

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच मुंबईत एका रुग्णालयाबाहेर दिली. तिच्यासोबत तिचे वडील आणि दिग्गज अभिनेते शक्ती कपूर हे देखील दिसली. दरम्यान दोघांनीही मास्क लावले आहेत. शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. त्यानंतर गाडीत जाऊन बसतात. आता शक्ती कपूर यांना नेमकं काय झालं? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की श्रद्धा साध्या (कॅज्युअल) अंदाजात हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. तर शक्ती कपूर यांनी गुलाबी रंगाची पँट आणि टीशर्ट घातला आहे. दोघांनीही तोंडाला मास्क लावले आहे. श्रद्धा कपूर रुग्णालयातून बाहेर येतात पापाराझींनी व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. श्रद्धाने पापाराझींना पाहिले, तेव्हा लगेच फोटो किंवा व्हिडीओ न काढण्याचा इशारा करताना दिसल्या.

चेकअपसाठी गेले होते शक्ती कपूर

या व्हिडीओमध्ये पाहता असे वाटते की शक्ती कपूर आपली मुलगी श्रद्धा कपूर हिच्यासोबत रुग्णालयात नियमित तपासणीसाठी (चेकअप) गेले असावेत. मात्र अद्याप स्पष्टपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. श्रद्धा आणि शक्ती कपूर नेमके कोणत्या कारणासाठी रुग्णालयात गेले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर सध्या अभिनेते शक्ती कपूर यांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने आताच तर नवे वर्ष सुरु झाले आहे. हे काय सुरु झाले असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत शक्ती कपूर यांना नेमकं काय झालं आहे? असा प्रश्न विचारला आहे.

श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट

आयुष्मान खुरानाच्या ‘थामा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी श्रद्धा कपूरने सांगितले होते की ‘स्त्री ३’ येण्यापूर्वी थिएटर्समध्ये ‘छोटी स्त्री’ नावाची एक अॅनिमेशन फिल्म प्रदर्शित होईल. याशिवाय त्या ‘स्त्री ३’ आणि ‘नागिण’मध्ये दिसणार आहे. तिच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.