Sharddha Kapoor : बयो, आधी घरातील पसारा तर आवर, मग… श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडिओवर का आल्या अशा कमेंट्स?
श्रद्धा कपूरच्या व्हायरल डान्स व्हिडिओवरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मायकल जॅक्सनच्या गाण्यावर मनसोक्त नाचताना तिच्या घरातील पसारा दिसला, ज्यावरून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. मात्र, श्रद्धाने तिच्या खास शैलीत मजेदार उत्तर देत ट्रोलर्सना शांत केले.

बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी हलक्या फुलक्या पोस्ट आणि रिल्स अपलोड करत असते. त्यामुळे चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन होतं. बुधवारी रात्री तिने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यावर कमेंटचा पाऊस पडला. या व्हिडिओत श्रद्धा कपूर दिलखुलासपणे नाचताना दिसत आहे. पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या व्हिडिओवर ती मनसोक्त नाचत होती. तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. सध्या तिचा हा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे.
मायकल जॅक्सनच्या गाण्यावर श्रद्धा मनसोक्त नाचताना दिसत आहे. तिच्या डान्सिंग स्किल्सही या निमित्ताने दाखवत आहे. कॅज्यूअल ड्रेसमधील तिचा हा डान्स अत्यंत मजेदार आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. त्यावर तिने, तुमच्यातील असा डान्स बाहेर आणू शकेल, अशा व्यक्तीचा शोध घ्या, असं कॅप्शन लिहिलं आहे. व्हिडिओच्या शेवटी ती मनमुराद हसतानाही दिसत आहे.
श्रद्धाचा डान्स हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर नवल. व्हिडिओ पोस्ट होताच तो व्हायरल झाला. अनेक सेलिब्रिटी या पोस्टवर मनमुरादपणे व्यक्त झाले. तर लोकांनी व्हिडिओ क्वीन, वेडी श्रद्धा अशा कमेंट केल्या. पण काही लोकांनी श्रद्धाच्या डान्स ऐवजी तिच्या घरातील पसाऱ्यावर बोट ठेवलं. काही लोकांनी तर तिला त्याबद्दल सल्लाही दिला. बयो, डान्स करण्यापूर्वी घरातील पसारा आवर… काहींनी अशी कमेंट केली. तर काहींनी लिहिलं, डान्स करण्यापूर्वी घरातील घाण स्वच्छ करत जा.
डियर मॉम…
किती घाण घर आहे. कमीत कमी व्हिडिओ तर ग्रीन स्क्रीनवर बनवायचा ना? अशी एकाने कमेंट केलीय. अर्थातच श्रद्धाच्या डोळ्याने या कमेंट्स टिपल्याच. तिनेही या कमेंट्सवर तितक्याच फनी स्टाईलने उत्तर दिलं. डियर मॉम, रियल आयडीने कमेंट कर, असं तिने म्हटलं. तिची ही खुशखुशीत आणि मजेदार कमेंट वाचून तिच्या फॅन्सलाही हसू आवरेना झालं.
राहुलसोबत केमिस्ट्री
श्रद्धा कपूरच्या या व्हिडीओतील राहुल मोदीचा सहभागही चाहत्यांना भारीच आवडला. त्यानेच श्रद्धाला असा डान्स करायला सांगितला. व्हिडिओच्या सुरुवातीला राहुलचा आवाज ऐकायला मिळतो. श्रद्धा आणि राहुल बऱ्याच कालापासून एकत्र आहेत. दोघांनी आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही. पण दोघेही नेहमी एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी तर दोघांच्या लग्नाच्या अफवेचा बाजार उठला होता. पण त्यात काही तथ्य आढळून आलं नाही.