AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युट्यूबवर 503 मिलियन व्ह्यूज, तरी तशा प्रकारचं गाणं पुन्हा कधीच न गाण्याचा श्रेया घोषालचा निर्णय

बॉलिवूडमधील अनेक हिट गाणी गायलेली गायिका श्रेया घोषाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ठराविक गाण्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. काही प्रकारची गाणी भविष्यात गाणार नसल्याचा निर्णय तिने घेतला आहे.

युट्यूबवर 503 मिलियन व्ह्यूज, तरी तशा प्रकारचं गाणं पुन्हा कधीच न गाण्याचा श्रेया घोषालचा निर्णय
Katrina Kaif and Shreya GhoshalImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 05, 2026 | 2:46 PM
Share

बॉलिवूड चित्रपटांमध्ये अशी अनेक गाणी आहेत, ज्याचे बोल महिलांना फक्त उपभोगाची वस्तू असल्याच्या दृष्टीकोनातून लिहिले गेले आहेत. यात विशेषकरून आयटम साँग्सचा समावेश होतो. हे आयटम साँग खूप गाजतात आणि त्यांना प्रत्येक पार्ट्यांमध्ये, लग्नामध्ये, डीजेमध्ये वाजवलं जातं. असंच एक गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटात होतं. ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर अभिनेत्री कतरिना कैफ थिरकली होती आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषालच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रेया अशा गाण्यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली असून भविष्यात अशी गाणी गाणार नसल्याचं जाहीर केलं.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये श्रेयाने सांगितलं की ‘चिकनी चमेली’नंतर तिला त्याच प्रकारच्या अनेक गाण्यांचे ऑफर्स येऊ लागले होते. या गाण्यांमध्ये महिलांना फक्त उपभोगाच्या वस्तूप्रमाणे दाखवण्यात येणार होतं. “माझ्या एका संगीतकार मित्रानेच मला अशा एका गाण्याची ऑफर दिली होती, ज्याचे बोल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील होते. मला फक्त त्या शब्दांबद्दल विचार करूनच लाज वाटली आणि लगेचच मी त्या गाण्याला नकार दिला. गाण्याचे बोल अत्यंत महत्त्वपूर्ण असतात आणि ही कलाकाराचीच जबाबदारी असते की त्यांनी विचारपूर्वक काम करावं”, असं श्रेया म्हणाली.

‘चिकनी चमेली’ या गाण्याबाबत श्रेयाने कबुली दिली की त्यावेळी तिला त्या ओळींचा अर्थ नीट समजला नव्हता. त्यावेळी मी इतकी हुशार नव्हते की मला त्या ओळींमागील अर्थ समजू शकेल, हे तिने मान्य केलं. याविषयी ती पुढे म्हणाली, “मी हेसुद्धा मान्य करते की या गाण्यात संगीत आणि प्रस्तुतीचीही तेवढीच कला आहे. जेव्हा एखादं गाणं सुपरहिट होतं, तेव्हा कॉन्सर्टमध्ये ते वारंवार गायला लागतं. अनेकदा लहान मुलांसमोर अशी गाणी गाताना संकोचलेपणा जाणवतो. मी चिकनी चमेली गाणं अनेकदा परफॉर्म केलंय. परंतु यापुढे अशा प्रकारचं गाणं मी रेकॉर्ड करणार नाही, ज्याचे बोल महिलांच्या दृष्टीकोनातून चुकीचे लिहिले आहेत. यापुढे मी कशा प्रकारची गाणी गातेय, याबाबत अधिक सजग राहीन.”

Follow Us
मोठी घडामोड! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच...
मोठी बातमी! 4 वाजताचा मुहूर्त ठरला, मात्र बंडखोर खासदार दोन वाजताच... मुंबई विमानतळावरील व्हिडीओमध्ये नेमकं काय?
विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
Vidhan Parishad Election | विधान परिषदेत कुणी कुणाला दिला दगा? मतफुटीची धक्कादायक आकडेवारी समोर
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात... राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
Nashik Vidhan Parishad | गोकुळ गीतेंच्या विजयाने कुटुंब भावूक; बहिणीला अश्रू अनावर
महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी!
Gokul Gite | महायुतीला धक्का देत जिंकले, पण विजय मिळताच मागितली माफी! गोकुळ गीतेंचं मोठं विधान
काही काळातच मोठं घडलं; ते एक विधान आणि.... आष्टिकरांच्या लेकाची पक्षात
काही काळातच मोठं घडलं; ठाकरे गटातील बंडखोर नेत्याला मोठा धक्का; पक्षाने थेट लेकाला...
ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; आष्टीकरांचा अंधारेंवर हल्लाबोल
Krushna Ashtikar | ती शिवसेनेचं ढेकूण, पक्षाचं रक्त पिते!; कृष्णा आष्टीकरांचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला...
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी...
शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला गौप्यस्फोट
Sanjay Raut UNCUT | मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं हसू खोटं? शिंदेंना दिल्लीतून बळ, फडणवीसांना कमकुवत....; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट
ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत माहिती
Big Breaking | ओमराजेंसह शिंदे 4 वाजताच... ठाकरे सेनेतील बंडखोर नेत्यांबाबत सर्वात मोठी अपडेट; राजकारणातील घडमोडींना वेग