
पवन कल्याणचा “दे कॉल हिम ओजी” हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पवन कल्याणसोबत इमरान हाश्मी आणि श्रेया रेड्डी यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. इमरान हाश्मीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याचसोबत या चित्रपटामुळे चर्चा आहे ती एका अभिनेत्रीची. ही जिने लागोपाठा 2 चित्रपट हीट दिले. ही अभिनेत्री म्हणजे ‘सलार’ ही अभिनेत्री श्रिया रेड्डी.
अभिनेत्री सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी 50 ते 60 पुश-अप करत असे.
प्रभाससोबत तिचा ‘सालार’ हा चित्रपटही हिट ठरला. त्यानंतर तिच्या अभिनयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्रेयाने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की ‘सालार’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान ती नेहमी सेटवर प्रत्येक शॉटपूर्वी 50 ते 60 पुश-अप करत असे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती वर्कआउट
श्रेयाने नुकत्याचं एका मुलाखतीत याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “मला आठवते की मी सालारमध्ये राधा रमाची भूमिका साकारण्यापूर्वी रोज 50 ते 60 पुशअप्स करत असायचे. मी नेहमीच प्रत्येक शॉटपूर्वी एक छोटाशी कसरत करत असे. मी माझ्या कॉस्ट्यूममध्ये माझ्या व्हॅनमध्ये, सेटवर जसं जमतील तसे पुशअप्स करायचे. पुशअप्स हा एक व्यायाम होता जो मी सहजपणे करू शकत असे. जेव्हा जेव्हा ते शॉटसाठी मला बोलवायचे तेव्हा मी त्यांच्याकडे थोडा वेळ मागत असे. मी लगेच माझ्या व्हॅनमध्ये जायचे आणि माझी कसरत करायचे आणि परत येत असे. त्यामुळे मला शक्तिशाली वाटायचे. जर मी इतक्या पुरुषांसोबत उभी असताना त्यांच्यासमोर मला अनबीटेबल स्वत:ला ठरवायचं असेल, तर मला ते आतून अनुभवावे लागले.
अशा प्रकारच्या तयारी तुम्ही स्वतःसाठी करूच शकता.” असं म्हणत ती प्रभाससमोर तेवढ्याच ताकदीची अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ती वर्कआउट करायची.
चित्रपटाची कमाई 183 कोटींच्याही पुढे
श्रीया रेड्डीच्या “दे कॉल हिम ओजी” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 183 कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाने सर्वांना मागे टाकले.