AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: घरातील डायनिंग टेबलकडे शेवटचं पाहिलं अन्..; ‘दृश्यम 3’मधील नंदिनी साळगावकर भावूक

Drishyam 3: अभिनेत्री श्रिया सरनने 'दृश्यम'च्या तिन्ही भागांमध्ये नंदिनी साळगावकरची भूमिका साकारली आहे. आता शेवटच्या भागात ही भूमिका साकारणं अत्यंत भावनिक अनुभव होता, असं ती म्हणाली.

Drishyam 3: घरातील डायनिंग टेबलकडे शेवटचं पाहिलं अन्..; 'दृश्यम 3'मधील नंदिनी साळगावकर भावूक
श्रिया सरनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2026 | 9:05 AM
Share

Drishyam 3: अभिनेत्री श्रिया सरन सध्या ‘दृश्यम 3’मधील तिच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. अभिनेता अजय देवगण याच्यासोबत तिने साकारलेली नंदिनी साळगावकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. मात्र, या भूमिकेला अखेरचा निरोप देताना श्रिया भावूक झाली. गेल्या 11 वर्षांपासून नंदिनीच्या व्यक्तिरेखेशी जोडलेली असल्यामुळे या प्रवासाचा शेवट तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा प्रवास श्रिया सरनसाठी केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नव्हता. या चित्रपटांमधून तिने नंदिनी या सामान्य गृहिणीपासून आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही संकटाचा सामना करणाऱ्या आईपर्यंतचा प्रवास साकारला. पहिल्या भागापासून तिसऱ्या भागापर्यंत या व्यक्तिरेखेत अनेक भावनिक बदल झाले. त्यामुळे अखेरच्या भागात नंदिनीची भूमिका साकारताना तिच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या.

‘दृश्यम 3’मध्ये शेवटच्या वेळी नंदिनी साकारण्याचा अनुभव भावनिकदृष्ट्या जड असल्याचं श्रियाने सांगितलं. या व्यक्तिरेखेचा निरोप घेणं सोपं नव्हतं. इतकी वर्षं ज्या व्यक्तिरेखेसोबत काम केलं, तिच्या आयुष्यातील चढ-उतार अनुभवले, त्या व्यक्तिरेखेपासून दूर होण्याची भावना वेगळीच होती. या प्रवासाने तिला अभिनयाच्या दृष्टीने अनेक गोष्टी शिकवल्या, असंही तिने नमूद केलं.

नंदिनी साकारण्याचं आव्हान

नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारण्यामध्ये एक वेगळंच आव्हान असल्याचं श्रियाने स्पष्ट केलं. विशेषतः तिसऱ्या भागात नंदिनीच्या मनातील असहायता, भीती आणि कुटुंबाबद्दलची काळजी तिच्या अभिनयातून व्यक्त करावी लागली. प्रत्येक वेळी संवादांच्या माध्यमातून भावना मांडता येत नाहीत. अनेकदा डोळ्यांतील भाव, चेहऱ्यावरील बदल आणि शांततेतूनही व्यक्तिरेखेच्या मनातील संघर्ष दाखवावा लागतो. नंदिनीच्या बाबतीत हे अधिक महत्त्वाचं होतं. कारण तिच्या आयुष्यातील परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची धडपड, भविष्यात काय होईल याची भीती आणि संकटातून बाहेर पडण्याची इच्छा या सगळ्या भावना श्रियाला आपल्या अभिनयातून व्यक्त कराव्या लागल्या. त्यामुळे ही भूमिका तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरली.

चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस श्रियासाठी विशेष भावनिक होता. सेटवरून बाहेर पडताना तिने घरातील डायनिंग टेबलकडे शेवटचं पाहिलं. त्या जागी अनेक महत्त्वपूर्ण दृश्यांचं चित्रीकरण झालं होतं. त्या आठवणी मागे सोडून जाण्याची भावना तिच्यासाठी जड होती. ‘दृश्यम 3’मधून नंदिनीचा प्रवास संपला असला, तरी या भूमिकेने दिलेल्या आठवणी आणि शिकवण कायम मनात राहतील, अशी भावना श्रियाने व्यक्त केली.

Follow Us
सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट...
Rohit Pawar : सुनेत्रा पवारांच्या पुणे पालकमंत्री पदावर रोहित पवारांचा सवाल, थेट म्हणाले...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही...
रायगड किल्ला उजळणार सौर ऊर्जेने! राज्यातील 11 ऐतिहासिक गडांवरही राबवणार विशेष मोहीम
रोहित पवारांच्या वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, राजकारण
रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर माधुरी मिसाळ संतापल्या; म्हणाल्या, 'राजकारणात इतका उतावळेपणा कशासाठी?'
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला