बॉयफ्रेंडला भाऊ बोलायची आणि त्याच्यासोबतच…, श्वेता तिवारीच्या पहिल्या नवऱ्याच्या हैराण करणारा दावा

Shweta Tiwari Personal Life: श्वेता सर्वांना भाऊ बोलायची आणि त्यांच्यासोबतच..., घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर राजा चौधरी याचा खासगी आयुष्यावर हैराण करणारा दावा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राजा चौधरी याची चर्चा...

बॉयफ्रेंडला भाऊ बोलायची आणि त्याच्यासोबतच..., श्वेता तिवारीच्या पहिल्या नवऱ्याच्या हैराण करणारा दावा
फाईल फोटो
| Updated on: Jun 29, 2025 | 12:11 PM

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत अभिनेत्रीने प्रेरणा ही भूमिका बजावली आणि चाहत्यांनी अभिनेत्रीला डोक्यावर घेतलं. त्यानंतर श्वेताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. छोट्या पडद्यावर यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या श्वेताने खासगी आयुष्यात मात्र अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्री दोन वेळा लग्नबंधनात अडकली. पण श्वेताला वैवाहिक आयुष्याचं सुख मिळालं नाही. अभिनेत्रीने दोन्ही पतींवर गंभीर आरोप केले.

वयाच्या 19 व्या वर्षी श्वेताने राजा चौधरी याच्यासोबत लग्न केलं. तर दुसरं लग्न अभिनव कोहली याच्यासोबत केलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राजा चौधरी याने श्वेता हिच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. राज म्हणाला, ‘अफेअरपूर्वी श्वेताने अभिनव याची ओळख भाऊ म्हणून करुन दिली.’ शिवाय कोर्टाने आदेश दिल्यानंतर देखील श्वेताने लेक पलक तिवारी हिला भेटू देखील दिलं नाही.

एवढंच नाही तर, राजा चौधरी याने कबूल केलं की, त्याने श्वेता तिवारीचा पाठलाग केला होता. तेव्हा श्वेता तिच्या एका मित्राच्या घरी गेली होती आणि काही लोकांना मारलं देखील होतं. पुढे राजाला विचारलं तू कोणाला मारलं होतं. यावर राजा म्हणाला, श्वेता ज्याला भाऊ बोलायची… श्वेता सर्वांना भाऊ बोलायची… त्यामध्ये अभिनव कोहली देखील होता. राजाला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताने अभिनव कोहली याच्यासोबत लग्न केलं.

 

 

राजा म्हणाला, ‘अभिनव याला श्वेता आधी भाऊ म्हणत होती. माझा भाऊ आहे… माझ्या भावाचा मित्र आहे… असं बोलायची आणि त्यानंतरच त्याच्यासोबत लग्न केलं.’ पण अभिनव कोहली याच्यासोबत देखील श्वेताचं लग्न टिकलं नाही.

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2012 मध्ये श्वेता आणि राजा यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली.