AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर ईशा – भरत पुन्हा एकत्र? कॅमेरा पाहून त्याने काढला पळ, व्हिडीओ व्हायरल

Esha Deol And Ex Husband Bharat Takhtani: घटस्फोटानंतर एका वर्षात पुन्हा एकत्र आले ईशा देओल आणि भरत तख्तानी..., 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या व्हिडीओची चर्चा...

घटस्फोटानंतर ईशा - भरत पुन्हा एकत्र? कॅमेरा पाहून त्याने काढला पळ, व्हिडीओ व्हायरल
फाईल फोटो
| Updated on: Jun 29, 2025 | 10:59 AM
Share

Esha Deol And Ex Husband Bharat Takhtani: घटस्फोटानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ज्यामुळे ईशा देओल चर्चेत आली. तर दुसरीकडे ईशा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे. सध्या ईशा हिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबई विमानतळावर ईशा हिला पूर्व पती भरत तख्तानी याच्यासोबत स्पॉट करण्यात आलं आहे. घटस्फोटानंतर ईशा आणि भरत पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2024 मध्ये दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र आल्यामुळे दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आहे. मुंबई विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर ईशा हिने पापाराझींना पोज दिल्या तर भरत याने पळ काढला. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Snehkumar Zala (@sneyhzala)

वडील आणि पूर्व पतीसोबत ईशा देओलचा फोटो

फादर्स डेच्या दिवशी ईशा हिने एक कुटुंबाचा फोटो शेअर केला ज्यामध्ये ईशा वडील धर्मेंद्र आणि भरत यांच्यामध्ये बसलेली दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘माझे वडील आणि माझ्या मुलींच्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा..’ अभिनेत्री हा फोटो देखील तुफान व्हायरल झाला.

घटस्फोटानंतर काय म्हणाली होती ईशा?

घटस्फोटानंतर ईशा हिने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला. ‘मी स्वतःला सिंगल मदरच्या रुपात पाहत नाही. कारण मी त्याप्रकारे व्यवहार करत नाही आणि करणार देखील नाही. एवढंच नाही तर, माझ्यासोबत तसं काही होऊ देखील देणार नाही.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. परिस्थिती बदलत असते. जर दोन लोकांमधील नातं चांगलं नसेल, विषेशतः मुलं झाल्यानंतर… तर गरजेचं नाही एकत्र राहिलंच पाहिजे… दोघांनी मिळून नव्या मार्गाचा विचार करायला हवा… म्हणजे मुलांना चांगले संस्कार देता येतील आणि आम्ही तेच करत आहोत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश