श्वेता तिवारीसोबत दिसणारा हा तरुण कोण? अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा, ऐकून तुम्हाला बसेल धक्का

श्वेता तिवारीच्या फोटोमध्ये दिसणारा हा व्यक्ती कोण? अभिनेत्रीने स्वत: केला मोठा खुलासा. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 20, 2026 | 6:03 PM
1 / 6
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या सौंदर्य आणि फिटनेसने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अशातच ती आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

2 / 6
श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘अनुपमा’ मालिकेत अंशची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता वरुण कस्तुरियासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्वेता आणि वरुण यांचे नाते खूपच जवळचे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती.

3 / 6
सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वत: श्वेता तिवारीने दिली आहेत. वरुण कस्तुरियाच्या वाढदिवसानिमित्त श्वेता तिवारीने फोटो शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या. या फोटोंसोबत दिलेल्या कॅप्शनमधूनच श्वेताने दोघांमधील नातं स्पष्ट केलं आहे.

4 / 6
श्वेता तिवारीने उघडपणे सांगितलं की, ती वरुणला आपला मुलगा मानते. एवढंच नाही तर तिने स्वतःला वरुणची आई असल्याचंही या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये श्वेता आणि वरुण समुद्रकिनारी उभे राहून कॅमेऱ्याकडे हसताना दिसत आहेत.

5 / 6
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये श्वेता तिवारीने लिहिलं की, 'मला माहिती आहे की वरुणने आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. तो एक खरा फायटर आहे'.

6 / 6
श्वेताने पुढे म्हटलं की, आईप्रमाणे ती नेहमी वरुणच्या पाठीशी उभी राहील आणि तो तिच्यासोबत आपल्या आयुष्यातील प्रत्येक आनंद आणि दुःख शेअर करू शकतो. तसेच वरुणसाठी तिचं प्रेम कधीच बदलणार नाही आणि ते कायम तसंच राहील असं देखील तिने म्हटलं आहे.