
Sara Tendulkar Break Up: क्रिकेटचे देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सारा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. आता देखील सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सारा आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. पण आता दोघांच्या ब्रेकअपचर्चा रंगल्या आहे. सारा आणि सिद्धांत दोघांचे कुटुंबिय एकमेकांना भेटल्यानंतर नातं मोडलं असल्याचं सांगितलं जात आहे.
रिपोर्टनुसार, सिद्धांत चतुर्वेदी याने स्वतःने नातं मोडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नुकताच सिद्धांत आणि सारा यांचा ब्रेकअप झालं आहे. हे नातं सिद्धांत याने संपवलं आहे. दोघांच्या कुटुंबियांची भेट आणि बोलणी झाल्यानंतर नातं मोडलं आहे. दोघांनी कधीच त्यांचं नातं सर्वांसमोर स्वीकारलं नाही. सुरुवातीपासून सारा आणि सिद्धांत यांनी नातं गुपित ठेवलं. पण कुटुंबियांची भेट झाल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत.’ असं देखील सांगितलं जात आहे.
सारा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर एकमेकांना ब्लॉक केलं आहे. ब्लॉक केल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. पण रंगणाऱ्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही फक्त अफवा आहेत. असं शुबमन याने सांगितलं होतं.
‘मी सध्या सिंगल आहे आणि माझ्या करीयरवर लक्ष केंद्रीत करत आहे…’ असं देखील शुबमन म्हणाला होता. शुबमन याला अनेकदा सारा हिच्यासोबत स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी कधीच त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिलं नाही. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
सिद्धांत याआधी देखील त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी सिद्धांतच्या नावाची चर्चा महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्यासोबत झाली. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण अचानक दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं.
सिद्धांत याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत 5 सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण त्याच्या लोकप्रियतेत ‘गहराईया’ सिनेमानंतर वाढ झाली. सिनेमात सिद्धांत याने अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यासोबत लव्ह सीन दिले. आता सिद्धांत लवकरच Dil Ka Darwaaza Khol Na Darling सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.सारा