AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत..’; ट्रोलर्सवर भडकला सिद्धार्थ चांदेकर

पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर चिन्मयने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

'जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत..'; ट्रोलर्सवर भडकला सिद्धार्थ चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2024 | 10:00 AM
Share

मुलाच्या ‘जहांगीर’ या नावावरून ट्रोलिंग होत असल्याने अभिनेता चिन्मय मांडलेकरने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं त्याने म्हटलंय. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रविवारी चिन्मयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो मुलाच्या नावावरून होत असलेल्या ट्रोलिंगविषयी व्यक्त झाला. मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं, यावरून नेटकरी चिन्मय आणि त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मयने हा निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती चाहत्यांकडून होत आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच ट्रोलर्सचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग’, असं म्हणत अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेही चिन्मयला निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.

सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट-

जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत’, असं सिद्धार्थ चांदेकरने लिहिलंय.

‘धुरळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी चिन्मयचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाहीये. त्यांना ते माहीत असतील असंही मला वाटत नाही. चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मागे घे आणि ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करतोस ती करत राहा.’

सर्वसामान्य नेटकऱ्यांनीहीह चिन्मयला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना तरी हे पटेल का? चिन्मय यांनी काही चुकीचं केलं नाही. नावावर जाऊ नका तर त्याच्या शिकवणीकडे बघा. महाराजांनी विविध जाती-धर्माच्या लोकांना जवळ केलं होतं. आता सुमारे 400 वर्षांनंतर आपण अशा गोष्टीवर भांडत आहोत’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...
नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा
Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय