AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धार्थ-कियारा ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ; विवाहस्थळावर झाला शिक्कामोर्तब

परदेशी नव्हे तर देशातील 'या' शहरात सिद्धार्थ-कियारा करणार लग्न

सिद्धार्थ-कियारा 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ; विवाहस्थळावर झाला शिक्कामोर्तब
Sidharth and KiaraImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2022 | 3:48 PM
Share

मुंबई- अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा होतेय. या दोघांनी लग्नाविषयी कमालिची गुप्तता पाळली आहे. मात्र त्यांच्या विवाहस्थळाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ आणि कियारा परदेशी लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र ते परदेशी नव्हे तर भारतातच विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सिद्धार्थ-कियारा लग्नाच्या स्थळाच्या शोधात आहेत. अखेर त्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे जागा मिळाल्याचं कळतंय.

पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ आणि कियारा चंदिगडमधील ‘द ओबेरॉय सुखविलास स्पा अँड रिसॉर्ट’मध्ये लग्न करणार आहेत. याच ठिकाणी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी लग्नगाठ बांधली होती.

कियारा आणि सिद्धार्थने आधी गोव्यातील एक जागा निवडली होती. मात्र सिद्धार्थचे बहुतांश कुटुंबीय, नातेवाईक पंजाबचे असल्याने त्यांनी गोव्याचा प्लॅन रद्द केला.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘शेरशाह’ या चित्रपटात पहिल्यांदा दोघांनी एकत्र मोठ्या पडद्यावर काम केलं होतं. या चित्रपटाला आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये सिद्धार्थची पहिल्यांदा कियाराशी ओळख झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

सिद्धार्थने ‘स्टुंडट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर कियाराने ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. माध्यमांसमोर हे दोघं मोकळेपणे रिलेशनशिपबद्दल बोलत नसले तरी अनेकदा या दोघांना पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.