AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiara Advani – Sidharth Malhotra यांच्या लग्नानंतर अभिनेत्याची एक्स – गर्लफ्रेंड कमेंट करत म्हणाली…

Kiara Advani - Sidharth Malhotra यांचा शाही अंदाजात पार पडला विवाहसोहळा... चाहत्यांसह सेलिब्रिटी नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना अभिनेत्याच्या एक्स - गर्लफ्रेंडने केलेली कमेंट चर्चेत

Kiara Advani - Sidharth Malhotra यांच्या लग्नानंतर अभिनेत्याची एक्स - गर्लफ्रेंड कमेंट करत म्हणाली...
विवाहबंधनात अडकल्यानंतर Kiara Advani - Sidharth Malhotra यांच्या लग्नाची पत्रिका समोर
| Updated on: Feb 08, 2023 | 10:12 AM
Share

Sidharth Kiara Wedding : अभिनेत्री किआरा अडवाणी (kiara advani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) यांचा जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये शाही अंदाजात लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, संगीत, हळदी कर्यक्रमानंतर दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी सप्तपदी घेतल्या आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते. पण कधीही दोघांनी त्यांचं नात्याची सर्वांसमोर कबुली दिली आहे. अखेर दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत लग्न झाल्याची घोषणा केली. आता इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. लग्नानंतर किआरा आणि सिद्धार्थ यांच्यावर चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील शुभेच्छा देत असताना सिद्धार्थ याची एक्स – गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील सिद्धर्थ आणि किआरा दोघांचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीवर दोघांचा फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘तुम्हाला दोघांना शुभेच्छा…’ सध्या अलियाने सिद्धार्थला दिलेल्या शुभेच्छांची देखील चर्चा रंगत आहे. (Sidharth Malhotra ex-girlfriend alia bhatt)

सांगायचं झालं तर, सिद्धार्थ आणि आलिया यांनी दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘ स्टून्डेट ऑफ द ईयर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. रिपोर्टनुसार, दोघांनी एकमेकांना तब्बल दोन वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं जास्त काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ( sidharth malhotra and kiara advani)

ब्रेकअपनंतर आलिया भट्ट हिने अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत लग्न केलं. तर सिद्धार्थ याने अभिनेत्री किआरा आडवाणी हिच्यासोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण दोघांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. दोघांना पती – पत्नीच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर दोघांनी लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. सध्या सर्वत्र सिद्धार्थ – किआरा यांच्या लग्नाच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, किआरा – सिद्धार्थ यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण रिलेशनशिपमध्ये असताना दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर कबूल केलं नाही. ‘शेहशाह’ सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमा हीट झाल्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोरदार रंगल्या. (kiara advani sidharth malhotra wedding)

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.