AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Singham Again Box Office: ‘बाजीराव सिंघम’ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा चित्रपट सिंघम अगेन आजपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करेल अशी अपेक्षा होती. सिंघम अगेनच्या पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई वरुन तुम्ही अंदाज लावू शकतात ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आणखी किती मोठं कलेक्शन करु शकतो.

Singham Again Box Office: 'बाजीराव सिंघम'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई
| Updated on: Nov 01, 2024 | 10:59 PM
Share

Singham Again Box Office Collection Day 1: अभिनेता अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट सिंघम अगेन आजपासून दिवाळीच्या दिवशी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या मल्टीस्टारर चित्रपटाची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ती प्रतिक्षा आता संपली आहे. सिंघम अगेन सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. अशी शक्यता वर्तवली जात होती. आता असेच काहीसे होताना दिसत आहे. सिंघम अगेनच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे.

बंपर ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शन आणि सिनेजगतातील बड्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे सिनेमा पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल असा दावा केला जात होता. वृत्त लिहिपर्यंत सिंघम अगेनने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 35 कोटींचा धमाकेदार व्यवसाय केला आहे. हा अंदाज आहेत, खरे आकडे यायला अजून थोडा वेळ लागेल. याशिवाय या कमाईच्या आकड्यांमध्येही बदल दिसून येतील. पण दिवाळीच्या सीझनमध्ये सिंघम अगेनने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग देण्याचा दावा केला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनला समीक्षकांकडून तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही जितका निर्मात्यांना अपेक्षित होता. पण एक मास ॲक्शन फिल्म म्हणून हा चित्रपट नक्कीच करिष्मा करताना पाहायला मिळेल.

रिलीजच्या पहिल्या दिवशी मोठ्या कमाईसह, सिंघम अगेनने अजय देवगणसाठी एक मोठा टप्पा गाठला आहे. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 2015 मध्ये रिलीज झालेल्या सिंघम रिटर्न्सने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 32 कोटींहून अधिक कमाई केली होती.

या चित्रपटात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स एकत्र दिसणार असल्याचे सिंघम अगेन या चित्रपटाच्या ट्रेलरमधून समोर आले आहे. अजय देवगण व्यतिरिक्त, करीना कपूर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि रणवीर सिंग यांसारख्या सेलिब्रिटींनी सिंघम अगेनमध्ये भूमिका केल्या आहेत.

याशिवाय चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये सलमान खानच्या एंट्रीनेही प्रेक्षकांना थिएटरमध्ये शिट्या मारायला भाग पाडले आहे. ओपनिंग वीकेंडपर्यंत सिंघम अगेन दमदार व्यवसाय करू शकेल, असा विश्वास आहे.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.