
Smriti Irani Says About Her Personal Life : स्मृती ईराणी असं नाव आहे जे अभिनय विश्व आणि राजकारणात देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यात स्मृती ईराणी यांनी चाहत्यांच्या मनावर आणि टीव्ही विश्वावर राज्य केलं. सांगायचं झालं तर, ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्यामुळे स्मृती इराणी चर्चेत आहेत. मालिकेतून स्मृती इराणी या तुलसी वीरानी म्हणून कमबॅक करणार आहे.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, 2000 मध्ये मालिके चाहत्यांच्या भेटीस आली. तेव्हा स्मृती यांनी घरा-घरात तुलसी म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलं. धक्कादायक म्हणजे मालिकेच्या सेटवर स्मृती इराणी यांचं मिसकॅरेज झालं होतं.
एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी मिसकॅरेजबद्दल मोठा खुलासा केला होता. मालिकेदरम्यान माणुसकीचा असा चेहरा पाहिला सागूंन स्मृत इराणी भावूक झाल्या. स्मृती इराणी यांना माहिती नव्हतं की, त्या प्रेग्नेंट आहेत. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांनी निर्मात्याकडे घरी जाण्याची परवानगी मागितली. पण त्यांनी घरी जाण्यास नकार देण्यात आला.
शुटिंग संपल्यानंतर संध्याकाळी स्मृती इराणी घरी जाण्यास निघाल्या. पण रस्त्यात त्यांना रक्तस्राव होण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्या रिक्षात बसल्या आणि रुग्णालयात गेल्या. डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना मिसकॅरेज झाल्याचं कळलं.
दुसऱ्या दिवशी स्मृती इराणी यांना निर्मात्यांचा फोन आला… अभिनेत्रीने मिसकॅरेज झाल्याचं सांगितलं असताना स्मृती इराणी यांना 2 वाजता शिफ्टसाठी येण्यास सांगितलं. स्मृती इराणी यांच्या को-स्टारने एकता कपूर हिला अभिनेत्री खोटं बोलत आहे असं सांगितलं… अशात स्मृती इराणी यांनी एकता कपूरला सर्व रिपोर्ट दाखवले.
स्मृती इराणी, एकता कपूरला म्हणाल्या, ‘ गर्भ जिवंत राहिला नाही, नाहीतर ते देखील दाखवलं असतं…’, असं देखली स्मृती इराणी म्हणाल्या. स्मृती इराणी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच असतात.
स्मृती ईराणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी स्मृती ईराणी टीव्ही विश्वात सक्रिय होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिके शिवाय त्यांनी ‘एक थी नायका’, ‘तीन बहूरानियां’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केलं. आता स्मृती ईराणी राजकारणात मोठी भूमिका बजावत देशाची सेवा करत आहेत.