करिश्मा कपूर प्रेमात ठरली कमनशिबी, 5 सेलिब्रिटींसोबत ब्रेकअप, तर नवऱ्याने पहिल्याच रात्री लावली बोली
अभिनेत्री करिश्मा कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. करिश्मा हिने घटस्फोटानंतर कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तर लग्नाआधी मात्र करिश्मा हिने 5 श्रीमंत सेलिब्रिटींना डेट केलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्या पाच सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेऊ...

फाईल फोटो
- अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं नाव अभिनेता अजय देनगण याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. ‘सुहाग’ सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेमबहरलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
- अजय देवगण आपली फसवणूक करत असल्याचं कळताच करिश्माने ब्रेकअपचा निर्णय घेतला आणि अभिनेता अक्षय खन्ना याला डेट करण्यास सुरुवात केली. दोघांचं कुटुंबियांमध्ये लग्नाची देखील बोलणी झाली होती. पण नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
- अक्षय आणि करिश्मा यांच्या जोडीला अभिनेत्रीच्या आईचा विरोध होता. तेव्हा करिश्मा बॉलिवूडची टॉप अभिनेत्री होती. अखरे अक्षय सोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिश्माच्या नावाची चर्चा अभिनेता गोविंदा याच्यासोबत रंगू लागली. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं.
- अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील करिश्मा हिच्या नात्याची चर्चा रंगली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. पण दोघांनी कधीच नात्यावर वक्तव्य केलं नाही.
- अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत तर करिश्माचा साखरपुडा देखील झालेला. पण आईच्या काही अटींमुळे दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिषेक याच्यासोबत तुटलेल्या नात्याचा अभिनेत्रीवर अत्यंत वाईट परिणाम झाला.
- अभिषेक याच्यासोबत नातं मोडल्यानंतर करिश्मा हिचं कुटुंबियांच्या इच्छेनुसार दिवंगत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न झालं. पण लग्नानंतर पहिल्याच रात्री संजय याने करिश्माची बोली लावली… असं देखील समोर आलं. दोन मुलांच्या जन्मानंतर अखेर संजय आणि करिश्मा यांचा घटस्फोट झाला.






