अभिनेत्रीवर रिक्षाचालकाकडून चाकूने वार, भिंतीवर डोकं आपटलं, त्यानंतर मसाला स्प्रे घेतला आणि…, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक
Actress Life after Marriage: संशय आला तिथेच सर्वकाही संपलं... अभिनेत्रीवर नवऱ्याकडून चाकूने वार, भिंतीवर आपटलं डोकं... आता कशी आहे अभिनेत्री परिस्थिती... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Actress Life: झगमगत्या विश्वात अभिनेत्री यशाच्या शिखरावर असल्यातरी खासगी आयुष्यात अभिनेत्रींना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. आता देखील असंच काही झालं आहे. अभिनेत्रीला पतीने जीवेमारण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अभिनेत्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कन्नड अभिनेत्री मंजुला श्रुती हिच्यावर महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील बेंगळुरू येथे पतीने संशयावरून चाकूने वार केले होते. श्रुतीवर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या पतीने तिच्यावर 4 जुलै रोजी हल्ला केला होता. श्रृती हिच्या पतीचं नाव अमरेश असून को रिक्षाचालक आहे. श्रुती आणि अमरेश यांचा 20 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन मुले देखील आहेत. ते हनुमंतनगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरेश आणि श्रृती यांच्या वैवाहिक आयुष्यात काही मतभेद होते, ज्यामुळे त्यांचे सतत वाद व्हायचे. रिपोर्टनुसार, काही महिन्यांपूर्वीच श्रृती आणि अमरेश विभक्त झाले होते. अभिनेत्रीने पती विरोधात हुंडाबळी आणि अत्याचारासारखे गंभीर आरोप देखील लावले होते. अमरेश विरोधात अभिनेत्री पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मंजुला उर्फ श्रृती… जिने काही मालिकांमध्ये देखीलकाम केलं आहे. तिला अमरेश याच्यावर प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. दोघांना दोन मुले देखील आहे. 20 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. चौकशीत असं समोर आलं की, त्यांच्या वैवाहिक जीवनात मतभेद असल्याने ते वारंवार भांडत होते. तीन महिन्यांपूर्वी मंजुलाने तिच्या पतीविरुद्ध हुंडा आणि छळाचा आरोप करत पोलिस तक्रार दाखल केली होती. गेल्या गुरुवारीच हे जोडपे पुन्हा एकत्र आले.’
पतीने अभिनेत्रीवर केले अमानुष वार
गेल्या गुरुवारी दोघांमधील वाद मिटले, पण यावेळी पुन्हा नवऱ्याकडे परत येणं अभिनेत्रीसाठी धोक्याची घंटा ठरली. रिपोर्टनुसार, अमरेश याने दुसऱ्यात दिवशी श्रृतीवर चाकूने हल्ले केले. मुलं कॉलेजला गेले असताना त्याने बायकोला मारहाण केली. सर्वात आधी अमरेश याने मसाला स्प्रेचा वापर केला. त्यानंतर तिच्या फासळ्यांवर, मांडीवर आणि मानेवर अनेक वार केले आणि तिचे डोके भिंतीवर आपटल्याचा आरोप आहे.
अमरेशला पोलिसांना केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघांमध्ये वाद सुरु असताना शेजारी अभिनेत्रीच्या मदतीसाठी धावून आले आणि तात्काळ अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल केलं. आता अमरेश याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीवर झालेल्या अन्यायाची चर्चा सुरु आहे.
