
Smriti Mandhana and Palash Muchhal : भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश यांचं लग्न होणार आहे. लग्नापूर्वीच्या सर्व विधी देखील झाल्या असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सांगली याठिकाणी स्मृती हिचं लग्न होत आहे आणि गावी लग्न व्हावं अशी स्मृती हिची इच्छा होती. ज्यासाठी सयाजी हॉटेल बूक करण्यात आला आहे. तर लग्नात किती पाहुण्यांना बोलावलं असेल, असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…
रिपोर्टनुसार, पलाश याचे पूर्वीच सांगितलं होतं की, इंटिमेट अफ्टरनून वेडिंग असेल… असं पलाश याने स्पष्ट केलं होतं. ज्यामध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातील जवळचे व्यक्ती काही मित्रमंडळी असतील… सुरुवातीपासूनच, दोघांनी भव्य आणि गोंगाटपूर्ण लग्नाऐवजी शांत, मर्यादित आणि पारंपारिक कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं.
स्मृती आणि पलाश यांच्या लग्नात किती लोक असतील हे देखील स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पलाश बाजूने 70 आणि स्मृती हिच्या बाजूने 70 मिळून 140 पाहूणे लग्नात उपस्थित राहणार आहेत. स्मृती विश्वचषक जिंकलेल्या खेळाडूंसह, आधीच तिथे पोहोचली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्याशिवाय, इतर कोणतेही मोठे सेलिब्रिटी आणि दिग्गज स्मृतीच्या लग्नात दिसणार नाहीत.
पलाश मुच्छल याच्या कुटुंबातील अनेक सदस्य लग्नस्थळी पोहोचले आहेत. इंदूरमधील त्यांच्या कुटुंबातील सुमारे 20 सदस्य लग्नाच्या तयारीत सक्रियपणे सहभागी असल्याची माहिती मिळत आहे. हळदी समारंभातही त्यांची उपस्थिती दिसून आली.
स्मृतीच्या वतीने महिला संघातील काही खेळाडू उपस्थित राहतील, तर संगीत क्षेत्रातील पलाश मुच्छल याच्या जवळच्या लोकांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. पण संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. मोठ्या सेलिब्रिटी, कडक सुरक्षा आणि लांब पाहुण्यांची यादी असलेल्या सामान्य बॉलिवूड कार्यक्रमांपेक्षा वेगळे, हे लग्न साधेपणा आणि कुटुंबाला प्राधान्य देण्याबद्दल असल्याचं दिसून येतं.
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या वयाच्या फरकाबद्दल बोलायचे झाले तर, पलाशचा जन्म 22 मे 1995 मध्ये झाला. तर स्मृती मानधना हिचा जन्म 18 जुलै 1996 रोजी झाला. म्हणजे, स्मृती आणि पलाश यांच्या वयात फक्त एक वर्ष आणि तीन महिन्यांचा फरक आहे…