AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुबेहूब सुशांत सारखा दिसतो ‘हा’ मुलगा; तेच डोळे, तोच चेहरा, पर्सनॅलिटी पाहून चाहत्यांना बसला धक्का

Sushant Singh Rajput: 'सुशांतचा दुसरा जन्म...', हुबेहूब सुशांत सिंह राजपूत सारख्या 'या' मुलाला पाहिल्यानंतर चाहत्यांना बसला धक्का... तेच डोळे, तोच चेहरा... व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत सारख्या दिसणाऱ्या मुलाची चर्चा..

हुबेहूब सुशांत सारखा दिसतो 'हा' मुलगा; तेच डोळे, तोच चेहरा, पर्सनॅलिटी पाहून चाहत्यांना बसला धक्का
| Updated on: Dec 06, 2024 | 9:22 AM
Share

Sushant Singh Rajput: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील चाहते अभिनेत्याला विसरू शकलेले नाहीत. सुशांत याचे जुने फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सुशांत आता त्याच्या चाहत्यांमध्ये नाही… यावर देखील अद्याप अनेकांचा विश्वास बसत नाही. चाहते कायम सोशल मीडियावर सुशांत याचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण आता सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील तरुण हुबेहूब सुशांत याच्या सारखा दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सुशांत पुन्हा आला… अशा कमेंट करत चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

हुबेहूब सुशांत सारख्या दिसणाऱ्या मुलाचं नाल डेमिन अयान असं आहे. डेमिन कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो. त्याच्या चेहऱ्यापासून व्यक्तिमत्त्वापर्यंत डोमिन सुशांतसारखा दिसतआहे. हा व्हिडिओ पाहून सुशांत सिंग राजपूतचे चाहते अवाक् झाले आहेत. एखाद्याचे रूप दुसऱ्याच्या सारखे कसे असू शकते, याचा विचार करूनही त्यांना आश्चर्य वाटतं. डेमिन अयानच्या या व्हिडिओवर सुशांतचे चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

डेमिनच्या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मला असं वाटलं सुशांतच आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सुशांतचा देखील चेहरा इतकाच क्यूट आणि इनोसेंट होता…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘मला माहिती होतं सुशांत परत येणार…’ सध्या सर्वत्र डेमिन याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

सुशांत याने 14 जून 2020 मध्ये स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सुशांत हत्या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. सारा अली खान, श्रद्धा कपूर, अनन्या पांडे यांसारख्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती.

सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष झाली आहेत. पण अभिनेत्याने टोकाचं पाऊल का उचललं? हे रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. सुशांतच्या कुटुंबियांकडून सतत न्याय मिळण्याची मागणी होत आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंह कायम सुशांतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.