आनंदी होती सोशल मीडिया स्टार, पण नियतीला नव्हतं मान्य, तिचा मृत्यू हृदयद्रावक

Social Madia Star : वयाच्या 36 वर्षी सोशल मीडिया स्टारने घेतला श्वास, सुट्ट्यांचा आनंद करत होती साजरा, पण नियतीला दुसरंच काही मान्य होतं... तिचा मृत्यू अत्यंत हृदयद्रावक, डॉक्टर देखील काही करू शकले नाहीत..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तिचीच चर्चा...

आनंदी होती सोशल मीडिया स्टार, पण नियतीला नव्हतं मान्य, तिचा मृत्यू हृदयद्रावक
| Updated on: Jun 23, 2024 | 8:54 AM

सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे, जिथे अनेकांना नवीन ओळख आणि प्रसिद्धी मिळाली आहे. फक्त सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अनेक जण जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात पोहोचले आहेत. सोशल मीडियाने अनेकांचं आयुष्य सावरलं आहे. पण जेव्हा सोशल मीडियावर राज्य करणाऱ्या सोशल मीडिया स्टारचं निधन होतं तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. आता देखील असंच काही झालं आहे. वयाच्या 36 व्या वर्षी एका सोशल मीडिया स्टारचं निधन झालं आहे.

वयाच्या 36 व्या वर्षी ज्या सोशल मीडिया स्टारचं निधन झालं आहे, तिचं नाव फराह एल काधी असं होतं. ट्युनिशियातील सोशल मीडिया स्टार आता या जगात नाही. माल्टामध्ये सुट्टीवर असताना प्रसिद्ध फराह हिचं निधन झालं आहे. फराह ही ‘लव्ह आयलँड माल्टा’च्या पहिल्या सीरिजसाठीही ओळखली जाते.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, माल्टा याठिकाणी एका यॉटवर सुट्ट्यांचा आनंद घेत असनात फराह हिचं निधन झालं. फराह सुट्ट्यांचा आनंद लुटत होती. पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं. यॉटवर असताना फराह हिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिने जगाचा निरोप घेतला.

यॉटवर असाताना फराह अचानक खाली पडली. त्यानंतर तिला तात्काळ यॉटमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टर देखील सोशल मीडिया स्टारवर उपचार करु शकले नाहीत. कारण रुग्णालयात पोहोचताना फराह हिचं निधन झालं.

 

 

फराह हिच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. कोणाला तिच्या निधनावर विश्वास देखील बसत नाही. कारण फराह हिने वयाच्या 36 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. कधी, कुठे आणि कसं काय होईल सांगता येत नाही…

फराह हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर तिचे 1 मिलियनपेक्षा देखील अधिक चाहते आहेत. तिच्या सोशल मीडिया बायोनुसार, एक सोशल मीडिया स्टार असण्याव्यतिरिक्त, फराह एका खाजगी कंपनीत आर्किटेक्ट आणि Faif च्या फॅशन ब्रँड बाजारची मालक देखील होती.