मलायका अरोराच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी, अरहान सावत्र आईसोबत स्पाॅट, मलायका निघाली थेट ‘या’ व्यक्तीच्या घरी..
Malaika Arora Photo : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर मलायका अरोरा सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय. नुकताच अरबाज खान याने दुसरे लग्न केले.

मुंबई : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अरबाज खान याचे लग्न झाल्यापासून तर मलायका अरोरा तूफान चर्चेत आलीये. अरबाजच्या लग्नानंतर मलायका अरोरा ही सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करताना दिसली. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट 2016 मध्ये झाला. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करतंय. घटस्फोट झाल्यानंतरही अनेकदा एकसोबत स्पाॅट होताना मलायका अरोरा आणि अरबाज खान दिसतात.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा लेक अरहान खान हा नुकताच सावत्र आई शूरा खान आणि वडील अरबाज यांच्यासोबत स्पाॅट झाला. अरहान डिनरला शूरा आणि अरबाज यांच्यासोबत गेला. हेच नाही तर वडिलांच्या लग्नात धमाल करताना देखील अरहान खान हा दिसला. शूरा खान आणि अरबाज खान यांच्यासोबत अरहान खान याला पाहून लोक हैराण झाले.
मलायका अरोरा हिच्या खासगी आयुष्यामध्ये बरेच काही सुरू आहे, हे मलायका अरोराने मध्यंतरी शेअर केलेल्या पोस्टवरून स्पष्ट दिसतंय. आता नुकताच मलायका अरोरा ही स्पाॅट झालीये. यावेळी सकाळी सकाळी मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याच्या घरी जाताना दिसत आहे. यावेळी एकदम साध्या लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसत आहे.

आता मलायका अरोरा हिचे अर्जुन कपूर याच्या घरी जातानाचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. सध्या मलायका अरोरा ही तिचा लेक अरहान खान याच्यासोबत दिसत नसल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
हेच नाही तर काहींनी तर थेट म्हटले की, अरबाज खान याच्यानंतर आता अरहान खान यानेही मलायका अरोरा हिची साथ सोडली आहे. मलायका अरोरा ही कायमच अर्जुन कपूर याच्यासोबत खास फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे विदेशात धमाल करताना दिसले. अर्जुन कपूरने मलायकाचे खास फोटोही शेअर केले होते.
