AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Titeeksha Tawde | मराठमोळी तितीक्षा तावडे ‘दृश्यम 2’मधील अभिनेत्याला करतेय डेट? पहा फोटो

तितीक्षाने बऱ्याच मालिका आणि काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित 'शाब्बाश मिठू' या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या ती 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Titeeksha Tawde | मराठमोळी तितीक्षा तावडे 'दृश्यम 2'मधील अभिनेत्याला करतेय डेट? पहा फोटो
Titeeksha TawdeImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2023 | 10:34 AM
Share

मुंबई : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेनं नुकतेच सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या फोटोंमधील एका खास व्यक्तीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तितीक्षासोबत या फोटोंमध्ये ‘दृश्यम 2’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके दिसला. कुटुंबीय आणि सिद्धार्थसोबतचे खास फोटो पोस्ट करत तितीक्षाने त्यांचे आभार मानले. सिद्धार्थ आणि तितीक्षा यांनी याआधीही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र या वाढदिवसाच्या फोटोंवरील कॅप्शनमुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ‘आयुष्यात सर्वाधिक प्रेम करणाऱ्या लोकांसोबत हा वाढदिवस साजरा केला’, असं तितीक्षाने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

तितीक्षाची पोस्ट

’33.. हा परफेक्ट वाढदिवस होता. मी ज्या लोकांवर प्रेम करते त्यांच्यासोबत मिळून हा वाढदिवस साजरा केला आणि जी लोकं माझ्यावर प्रेम करतात, त्यांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यापेक्षा अधिक आणखी काही नको असं जर मी म्हटलं तर ते खोटं ठरेल. कारण मी यापेक्षा अधिक वेळ मागू इच्छिते, जेणेकरून तुम्हा प्रत्येकाच्या मेसेजला मी उत्तर देऊन ते माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगू शकेन. तुम्हा सर्वांनी माझा दिवस खूप खास केला’, असं तिने लिहिलं आहे.

तितीक्षाने बऱ्याच मालिका आणि काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘शाब्बाश मिठू’ या चित्रपटातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. तर सिद्धार्थ बोडकेनं ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तो अजय देवगण, तब्बू यांच्या ‘दृश्यम 2’ या चित्रपटातही झळकला.

‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तितीक्षाने सुशीलसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ‘यासाठी मी तुला खूप मेहनत घेताना पाहिलं आहे. तू केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. तू चमकलास. तुझ्या लहानातल्या लहान कामगिरीवर मला नेहमीच अभिमान वाटतो आणि तुला मिळालेलं हे काम खूप मोठं आहे. त्यावर कसं व्यक्त व्हावं हेच मला सुचत नाहीये’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या होत्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?