AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | “तिने सलमानला माझ्या घरी रंगेहाथ पकडलं अन्..”; अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

सलमान खान आणि लग्न हा विषय काही नवीन नाही. सलमान कधी आणि कोणाशी लग्न करणार, हा सवाल आजही अनुत्तरितच आहे. मात्र इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे.

Salman Khan | तिने सलमानला माझ्या घरी रंगेहाथ पकडलं अन्..; अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Somy Ali, Salman Khan and Sangeeta BijlaniImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असला तरी एकेकाळी सलमानच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. होय, हे खरं आहे. अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत सलमान लग्न करणार होता. त्याच्या कुटुंबीयांनीही दोघांच्या नात्याला होकार दिला होता. इतकंच नव्हे तर दोघांच्या लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र ऐनवेळी असं काही घडलं, ज्यामुळे संगीताने सलमानसोबतचं लग्न मोडलं. याला अभिनेत्री सोमी अली कारणीभूत असल्याचं याआधी अनेकदा म्हटलं गेलं. सोमी अलीमुळेच सलमान आणि संगीताचा साखरपुडा मोडल्याच्या जोरदार चर्चा होत्या. आता त्यावर खुद्द सोमीनेच शिक्कामोर्तब केला आहे.

शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत सोमी याविषयी खुलासा करत म्हणाली, “लग्नाच्या पत्रिका छापल्या होत्या पण संगीताने सलमानला माझ्या घरी रंगेहाथ पकडलं होतं. सलमानने जे संगीतासोबत केलं, तेच माझ्यासोबतही केलं. यालाच कर्म म्हणतात. नंतर मला या गोष्टी समजू लागल्या होत्या.” सलमान आणि संगीता हे 1986 मध्ये एकमेकांना डेट करू लागले होते. हे दोघं जवळपास आठ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. 1994 मध्ये दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच संगीताने सलमानला सोमी अलीच्या घरी रंगेहाथ पकडलं होतं.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सलमाननेही याबद्दलची कबुली दिली होती. “एक वेळ अशी होती, जेव्हा मला खरंच लग्न करायचं होतं. मात्र ते होऊ शकलं नाही. मी बॉयफ्रेंड म्हणून ठीक आहे, पण मला आयुष्यभर झेलण्यासाठी कोणीच तयार नसतं. संगीतासोबत माझ्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या”, असं तो म्हणाला होता.

सलमान-संगीताची मैत्री

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सलमान शाहीन जाफरीला डेट करत होता. शाहीन ही अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी आहे. सलमान आणि शाहीद अनेकदा मुंबईच्या हॉटेलस सी-रॉक हेल्थ क्लबमध्ये जायचे. संगीता बिजलानीसुद्धा त्या क्लबची रेग्युलर मेंबर होती. त्यावेळी संगीताचं नुकतंच अभिनेता बिंजू अलीशी ब्रेकअप झालं होतं. एकेदिवशी संगीताची भेट सलमानशी झाली. त्यावेळी ती बॉलिवूडमध्ये स्टार होती आणि सलमानने अद्याप पदार्पण केलं नव्हतं. संगीताने सलमानचे वडील सलीम खान यांनी लिहिलेल्या ‘जुर्म’ चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे दोघांना मैत्री करायला फार वेळ लागला नाही.

अभिनेत्रीने केला सलमानचा पाठलाग

सलमानच्या बदलत्या स्वभावामुळे तिने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्यातूनच तिला धक्कादायक बातमी समजली. सलमान त्यावेळी गुपचूप अभिनेत्री सोमी अलीला डेट करत होता. हे समजल्यानंतर संगीताने लग्न मोडलं. जासिम खान यांनी लिहिलेल्या ‘बीईंग सलमान’ या पुस्तकात याचा खुलासा करण्यात आला आहे. संगीताने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “लग्नाच्या महिनाभरापूर्वी मला समजलं होतं की काहीतरी गडबड नक्की आहे. मी त्याचा पाठलाग सुरू केला आणि समजलं की तो लग्नाच्या लायकच नाही. लग्नच काय तर तो बॉयफ्रेंडच्याही लायकीचा नाही. माझ्यासाठी तो सर्वांत वाईट अनुभव होता, मी खूप खचले होते.”

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.