Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनालीचा मुलगा खेळात निपुण, उंच-हँडसम रणवीरला पाहून चाहते आवाक्, अभिनेत्रीच्या लेकाला पाहून म्हणाले…

Sonali Bendre Son: सोनाली बेंद्रेच्या मुलाला पाहुन चाहचे अवाक्, उंच-हँडसम रणवीरला पाहून चाहते म्हणाले..., खेळात निपुण आहे अभिनेत्रीचा लेक, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असतो चर्चेत...

सोनालीचा मुलगा खेळात निपुण, उंच-हँडसम रणवीरला पाहून चाहते आवाक्, अभिनेत्रीच्या लेकाला पाहून म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 16, 2025 | 1:38 PM

Sonali Bendre Son: एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, टीव्ही विश्वात सक्रिय आहे. अनेक शोमध्ये अभिनेत्री परीक्षकाच्या भूमिकेत दिसते. पण आता सोनाली तिच्या कोणत्या सिनेमामुळे किंवा कोणत्या अन्य कारणामुळे नाही तर, मुलामुळे चर्चेत आली आहे. सोनाली बेंद्रेच्या मुलाला पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिच्या मुलाची चर्चा रंगली आहे.

सोनाली बेंद्रे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींसोबत सोनाली हिच्या नावाची चर्चा रंगली. पण अखेर सोनाली हिने गोल्डी बहल याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगा आहे. सोनाली आणि गोल्डी यांच्या मुलाचं नाव रणवीर असं आहे. सध्या रणवीरचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. उंच-हँडसम रणवीरला पाहून चाहत्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.

लहानपणी खूप गोंडस आणि गोलू मोलू दिसणारा रणवीर बहल आता खूप उंच आणि देखणा झाला आहे. दिसायला तो हुबेहुब त्याच्या आईसारखा आहे. त्याचे तीक्ष्ण नाक, मोठे डोळे आणि मोहक हसण्याचा वारसा त्याच्या आईकडून मिळाला आहे. उंचीच्या बाबतीतही तो कमी नाही. त्याची उंची वडील गोल्डी बहल यांच्यापेक्षा जास्त आहे.

रणवीर बहलचा जन्म 2005 साली झाला. रणवीरचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याला हिरो बनवायला सुरुवात केली आहे. सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीर खेळात खूप सक्रिय आहे. एकदा अभिनेत्री मुलाच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली होती. रणवीर याला दम्याचा त्रास आहे. रणवीरला लहान असताना दमा असल्याची माहिती तिला मिळाली… असं अभिनेत्रीने मुलाखतीत दिली.

पण सोनाली बेंद्रेने कधीही आजाराला मुलावर वर्चस्व गाजवू दिलं नाही. आपल्या मुलाला मजबूत बनवण्यासाठी, सोनाली बेंद्रेने मुलाला अगदी लहान वयातच पोहायला लावलं. त्याला कार्डिओही करून दिला. याशिवाय त्याला खेळातही सक्रिय ठेवण्यात आले. यामुळे मुलाला आठवड्यातून एकदाच इनहेलरची आवश्यकता असते. सोनाली कायम तिच्या मुलासोबत आणि नवऱ्यासोबत फोटो पोस्ट करत असते.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.