Sonu Nigam | “जेव्हा तुम्ही जबरदस्ती सेल्फी..”; कॉन्सर्टनंतरच्या धक्काबुक्कीप्रकरणी सोनू निगमची प्रतिक्रिया

| Updated on: Feb 21, 2023 | 9:51 AM

याविरोधात सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. हा संपूर्ण वाद एका सेल्फीमुळे झाल्याचं कळतंय.

Sonu Nigam | जेव्हा तुम्ही जबरदस्ती सेल्फी..; कॉन्सर्टनंतरच्या धक्काबुक्कीप्रकरणी सोनू निगमची प्रतिक्रिया
Sonu Nigam
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : मुंबईत सोमवारी रात्री गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्कीची घटना घडली. या संपूर्ण घटनेत सोनू निगमची जवळची व्यक्ती रब्बानी खान याला मार लागला. ठाकरे गटाचे शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातर्पेकर यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप आहे. याविरोधात सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. हा संपूर्ण वाद एका सेल्फीमुळे झाल्याचं कळतंय.

सोनू निगमची प्रतिक्रिया

मुंबईतील चेंबूर परिसरात लाइव्ह परफॉर्मन्सनंतर जसा सोनू निगम बाहेर पडला, तसं पायऱ्या उतरताना त्याच्यासोबत ही घटना घडली. याप्रकरणी आता सोनू निगमची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं की कोणतीच धक्काबुक्की झाली नाही. “मी यासाठी तक्रार दाखल केली कारण लोकांनी जरा विचार करायला हवा की जेव्हा तुम्ही जबरदस्ती फोटो किंवा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करता. त्यानंतर उद्धटपणा, धक्काबुक्की.. हे सर्व घडतं”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“कॉन्सर्ट संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली उतरत होतो. तेव्हा स्वप्नील प्रकाश फातर्पेकर यांनी मला अडवलं. त्यानंतर त्यांनी हरी आणि रब्बानी यांना ढकललं, जे मला वाचवायला आले होते. त्यानंतर मी पायऱ्यांवर पडलो”, असं त्याने पुढे सांगितलं.

पहा व्हिडीओ

या घटनेविषयी बोलताना सोनू पुढे म्हणाला, “माझ्याकडे एक व्यक्ती सेल्फीसाठी आली होती. मी नकार दिल्यानंतर त्याने मला अडवलं. नंतर समजलं की तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्पेकर आहे. मला वाचवण्यासाठी हरीप्रसाद मध्ये आले. त्याने त्यांनाही धक्का दिला, त्यानंतर मला धक्का दिला. धक्क्यामुळे मी खाली पडलो. मला वाचवण्यासाठी रब्बानी पुढे आले तर त्यांनाही धक्का दिला. ते थोडक्यात बचावले, नाहीतर त्यांना गंभीर दुखापत झाली असती. त्यात त्यांचे प्राणही जाऊ शकले असते. रब्बानी यांचं नशिब चांगलं होतं की खाली कोणती लोखंडी वस्तू नव्हती.”

सोनू निगम 20 फेब्रुवारी रोजी आमदार प्रकाश फातर्पेकरद्वारा आयोजित चेंबूर फेस्टिव्हलच्या फिनालेमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला होता. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू निगमच्या तक्रारीनंतर स्वप्निल यांच्याविरोधात आयपीसीच्या 341, 337, 323 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.