Kriti Sanon : हिंदूची आणखी किती परीक्षा घेणार…, ‘राखी’च्या जाहिरातीत कृतीचा ब्रालेट लूक, सोनू निगम काय म्हणाला?
Kriti Sanon : आभिनेत्री कृती सेनॉन हिच्या तोकड्या कपड्यांचा वाद अद्यापही शमलेला नाही. गायक सोनू निगम यांच्या नावाने देखील एक फेक वक्तव्य व्हायरल झालं होतं. त्यावर आता खुद्द गायकाने मोठं वक्तव्य केलं आहे.

Kriti Sanon : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री कृती सेनॉन हिच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीची चर्चा सुरु होती. पण जाहिरातीत कृती हिने घातलेल्याा कपड्यांमुळे वाद टोकाला पोहोचला आणि कंपनीला ती जाहिरात अखेर डिलिट करावी लागली. सांगायचं झालं तर, जाहिरातीवर नेटकऱ्यांनी आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी आक्षेप घेतला. दरम्यान, गायक सोनू निगम याच्या याच्या नावाने देखील पोस्ट व्हायरल झालेली. पण ती पोस्ट गायकाची अधिकृत पोस्ट नव्हती. यावर आता सोनू निगम याने स्पष्टीकरण दिलं आहे.
सोनू निगमच्या ट्विटचं सत्य
‘सोनू निगम सिंग’ नावाच्या एका ‘एक्स’ (X) अकाउंटवरून कृतीच्या जाहिरातीबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली होती. लोकांनी ती पोस्ट म्हणजे खुद्द सोन निगम याची अधिकृत प्रतिक्रिया आहे, असा समज करून घेतला. आता सोनूने यावर मोठं वक्तव्य केलं आहे. स्क्रीनशॉट शेअर करत त्याने लिहिलं, “ही व्यक्ती मी नाही. तसंच, मी असं कोणतंही विधान कधीच केलेलं नाही. प्रसारमाध्यमांनी आता तरी जागं होण्याची गरज आहे.”
विवाद ये कतई नहीं है कि महिला क्या पहनें… दिक्कत दोगलेपन से है और हिंदू त्योहारों पर लोगों को उनकी परंपराओं से प्रभावित करने वाले हथकंडों से है।
क्योंकि ऐसा नहीं है कि कृति सेनन ने कोई पहली बार कुछ ऐसा पहना है और विवाद हो गया।
कब क्या पहनना चाहिए इसका एक सलीका होता है। उदाहरण… pic.twitter.com/7KwZprdL6w
— Sonu Nigam (@SonuNigamSingh) August 26, 2026
एक्सवर ट्विट करत सोनू निगम म्हणाला, ‘महिलेने काय घातलं पाहिजे हा मुळात वाद नाहीच… अडचण वाईट मानसिकतेची आहे. हा विषय हिंदू सणांच्या काळात लोकांच्या परंपरांबाबत त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या युक्त्यांशी संबंधित आहे. तसं पाहता, कृतीने घातलेल्या एखाद्या गोष्टीमुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काय आणि कधी परिधान करावं याबद्दल काही विशिष्ट संकेत किंवा शिष्टाचार असतात; उदाहरणार्थ, गुरुद्वारात जाताना डोके झाकण्याची परंपरा आहे, तसेच मंदिरात जाताना अंग पूर्ण झाकलं जाईल असे साधे कपडे घातले जातात.
‘अनेक मंदिरांमध्ये. पुरुषांना हॉफ पँट घालण्यासाठी देखील बंदी आहे. तरीही, तिथे विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्याच्या स्वातंत्र्याबाबत कोणीही गदारोळ करत नाही. त्यामुळे, ‘बळी’ ठरल्याचं नाटक करण्याऐवजी, या लोकशाही देशातील हिंदूंच्या श्रद्धेवर प्रहार करणे थांबवा. हिंदू सहिष्णू आहेत याचा अर्थ असा नाही की, तुम्ही वारंवार हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेत राहावं. जाहिरात हटवल्यामुळे GIVA चे आभार…’, असं देखील सोनू निगम म्हणाला.
