कोराना काळात देवदुतासारखा धावणारा सोनू सूद कशी करतो कोट्यवधींची कमाई?

Happy Birthday Sonu Sood : कोरोना काळात कसलाच विचार न करता अनेकांच्या मदतीसाठी धावणार सोनू सूद गडगंज संपत्तीचा मालक, कशी कशी करतो कोट्यवधींची कमाई?, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू सूद याची चर्चा

कोराना काळात देवदुतासारखा धावणारा सोनू सूद कशी करतो कोट्यवधींची कमाई?
| Updated on: Jul 30, 2024 | 3:37 PM

Happy Birthday Sonu Sood : 2020 मध्ये फक्त भारतात नाहीतर, जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता. कोरोना काळात अनेक जण एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आहे. तर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने तर असंख्या लोकांना कोरोना काळात मदत केली. अभिनेत्याने कोरोना काळात केलेलं कार्य विसरता येणारं नाही. कोरोना काळात उपचारापासून पदार्थ देण्यापर्यंत सर्वच जबाबदारी अभिनेत्याने उचलली. निराधारांसाठी आपल्या घराचे दरवाजे उघडले. असंख्य लोकांच्या मदतीसाठी पुढे येणार सोनू सूद याच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊ..

आज सोनू सूद याचा वाढदिवस आहे. 50 वर्षांचा अभिनेता सिनेमा निर्माता, अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. अभिनेत्यने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्याने हिंदी शिवाय तेलुगु, कन्नड आणि तमिळ सिनेमांमध्ये देखील कायम केलं.

अनेक सिनेमांमध्ये सोनू सूद याने खलनायकाच्या भूमिकेल्या न्याय दिला. पण सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता कोरोना काळात हिरो म्हणून प्रसिद्धी झोतात आहे. सोनू सूद याच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1999 मध्ये अभिनय विश्वात पदार्पण केलं.

साऊथ सिनेविश्वातून सोनू सूद याच्या करियरची सुरुवात झाली. त्यानंतर अभिनेता ‘आशिक बनाया आपने’ (2005) सिनेमात झळकला. सिनेमामुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर सोनू सूद ‘जोधा अकबर’ आणि ‘दबंग’ सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली.

सोनू सूद याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 1996 मध्ये सोनाली हिच्यासोबत लग्न केलं. सोनू सूद आणि सोनाली यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलांची नावं अयान आणि इशांत अशी आहेत. अभिनेता कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगतो…

सोनू सूद याची संपत्ती

सोनू सूद याची 2024 मधील नेटवर्थ 18 मिलियन डॉलर म्हणजे 140 कोटी रुपये आहे. प्रत्येक महिन्याला अभिनेता 1 कोटी पेक्षा अधिक कमाई करतो. वर्षभरात अभिनेता 12 कोटींपेक्षा अधिक कमाई करतो. सोनू सूद फक्त सिनेमांमधून नाही तर, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कमाई करतो.

मुंबईत सोनू सूद याचं आलिशान घर आहे. ज्यामध्ये चार बेडरुम, हॉल… असा भव्य घर आहे. ज्यामध्ये अभिनेता कुटुंबासोबत राहातो. शिवाय अभिनेत्याचे मुंबईत आणखी दोन फ्लॉ्स आहे. होमटाऊनमध्ये अभिनेत्याचा स्वतःचा बंगला आहे. मुंबई येथील जुहू याठिकाणी अभिनेत्याचं स्वतःचं हॉटेल देखील आहे.

सोनू सूद याचं कार कलेक्शन

सोनू सूद कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो. अभिनेत्याकडे 66 लाख रुपयांची Mercedez benz ML class 350 CDI आहे. 80 लाख रुपयांची Audi Q7 आणि 2 कोटी रुपयांची Porsche Panama आहे.