Aishwarya Rai : ‘फक्त तुझ्यासाठी जगतेय…’, घटस्फोटाच्या चर्चा, असं कोणाला म्हणली ऐश्वर्या राय?
Aishwarya Rai : घटस्फोटामुळे चर्चेत असलेली ऐश्वर्या राय 'फक्त तुझ्यासाठी जगतेय...', असं कोणाला म्हणाली? गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या खाजगी आयुष्याच्या चर्चा तुफान रंगल्या आहे. ऐश्वर्या आता अभिनय क्षेत्रात पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी, तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. नुकताच ऐश्वर्या राय हिचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ऐश्वर्याला हिला आयुष्यातील खास क्षण कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली होती, ‘तो क्षण यायचा आणि, माझं बाळ येईल तेव्हा तो आयुष्यातील खास क्षण असेल…’ असं अभिनेत्री म्हणाली.
दरम्यान, 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने 2011 मध्ये लेक आराध्या हिला जन्म दिला. आराध्या हिच्या जन्मानंतर ऐश्वर्या हिचं संपूर्ण आयुष्य बदललं. लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देखील अभिनेत्री ‘मी फक्त तुझ्यासाठी जगतेय…’ असं म्हणाली होती.
View this post on Instagram
मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, ‘आराध्या आणि माझ्यात फार घट्ट नातं आहे. माझा दिवस आराध्यापासून सुरु होतो आणि तिच्यापासून संपतो…’ शिवाय ऐश्वर्या लेकीसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते तेव्हा आराध्या हिच्यावर असलेलं प्रेम कायम व्यक्त करताना दिसते.
ऐश्वर्या कायम लेक आराध्या हिला स्वतःसोबत घेवून फिरत असते. ज्यामुळे आराध्या हिला आईच्या मल्टी – टास्किंग आयुष्याबद्दल माहिती होईल. ऐश्वर्या हिने कधीच आराध्या हिच्यासाठी नर्स किंवा नॅनी ठेवली नाही. असं खुद्द ऐश्वर्या हिने सांगितलं होतं. शिवाय, आराध्या हिच्यासाठी कोणती खास व्हॅन नाही. ऐश्वर्या कायम आराध्याला शाळा सुटल्यावर घ्यायला जायची आणि त्यानंतर शुटिंगच्या सेटवर…
View this post on Instagram
ऐश्वर्या म्हणाली होती, अभिनेत्रीने कधीच लेक आराध्या हिला कोणतं गॅजेट दिलं नाही. महानायक अमिताभ बच्चन यांनी नातीला टॅब दिला होता. पण त्या टॅबचा उपयोग आराध्या एक पुस्तक म्हणून करते. समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असताना फोनमध्ये पाहाणं ऐश्वर्याला आवडत नाही… म्हणून आराध्या हिला गॅजेट दिलं नाही.
