सुशांतच्या घराबाहेर दिसलेली व्यक्ती मी नव्हतो, तर..; सूरज पांचोलीच्या दाव्याने पुन्हा चर्चेला उधाण

दिशा सालियान प्रकरणात सध्या सीबीआयचा तपास सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाशी संबंधित जुन्या दाव्यांची आणि चर्चांची पुन्हा चर्चा होत आहे. अशातच सूरज पांचोलीने भलीमोठी पोस्ट लिहित त्याची बाजू मांडली आहे.

सुशांतच्या घराबाहेर दिसलेली व्यक्ती मी नव्हतो, तर..; सूरज पांचोलीच्या दाव्याने पुन्हा चर्चेला उधाण
Sooraj Pancholi and Sushant Singh Rajput
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2026 | 8:20 AM

Sooraj Pancholi: सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्याशी संबंधित प्रकरणांची चर्चा पुन्हा एकदा सुरू असताना अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर केलेल्या एका कमेंटमुळे नवा मुद्दा समोर आला आहे. सुशांतच्या निधनाच्या दिवशी त्याच्या घराबाहेर सूरज पांचोली दिसल्याचा दावा सोशल मीडियावरील एका कमेंटमध्ये करण्यात आला होता. या दाव्यावर सूरजने प्रतिक्रिया देताना आपण नव्हे, तर सुशांतचा मित्र सिद्धार्थ गुप्ता त्या ठिकाणी असल्याचं म्हटलं आहे. सूरज पांचोलीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचं पुन्हा स्पष्ट केलं. आपल्या आयुष्यात आपण दिशा सालियानला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधीही भेटलो नसल्याचं त्याने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचीही कधी भेट झाली नसल्याचं सूरजने सांगितलं. या प्रकरणाशी आपलं नाव जोडून सातत्याने ट्रोल केलं जात असल्याचंही त्याने म्हटलं.

नेमका काय होता दावा?

सोशल मीडियावरील एका कमेंटमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दिवशी सकाळी त्याच्या घराबाहेर सूरज पांचोलीला पाहिल्याचा दावा करण्यात आला. यासोबतच या घटनेशी संबंधित काही कथित गोष्टी भविष्यात समोर येतील, असंही त्या कमेंटमध्ये म्हटलं होतं. या दाव्याला उत्तर देताना सूरजने थेट स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. सूरजच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या निधनाच्या दिवशी त्याच्या घराबाहेर दिसलेली व्यक्ती आपण नव्हतो. ती व्यक्ती सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ गुप्ता असल्याचं त्याने सांगितलं. आपल्यावर विनाकारण आरोप केले जात असल्याचं म्हणत आता या अफवांवर स्पष्टीकरण देणं गरजेचं असल्याचंही सूरजने स्पष्ट केलं.

पहा कमेंट-

सिद्धार्थ गुप्ताचंही स्पष्टीकरण

सूरज पांचोलीच्या या प्रतिक्रियेनंतर सिद्धार्थ गुप्तानेही संबंधित व्हिडीओबाबत आपली बाजू मांडली. गेटजवळ दिसणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये आपण आणि कुश नावाची व्यक्ती असल्याचं सिद्धार्थने सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला त्याच्या प्रतिक्रियेमुळे आणखी वेगळं वळण मिळालं आहे.

दरम्यान, सूरजने आपण आपल्या आयुष्याची आणि करिअरची पुन्हा उभारणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. ज्या घटनांशी आपला संबंध नाही, त्यामध्ये आपलं नाव जोडल्यामुळे आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे गेल्याचं त्याचं म्हणणं आहे. तपास यंत्रणांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास करावा आणि सत्य समोर आणावं, अशी भूमिकाही त्याने मांडली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us