मलायका अरोरानंतर पुन्हा अर्जुन कपूर प्रेमात? थेट इंग्लंडमधील तो फोटो पुढे, अभिनेत्री नात्यावर..
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा विभक्त झाली आहेत. दोघे काही वर्ष एकमेकांना डेट करताना दिसले. त्यानंतर आता थेट साहिबा हिच्यासोबत अर्जुनचे नाव जोडले जात आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा वाढला. अर्जुन कपूर याचे नाव साहिबा बाली हिच्यासोबत सोडले जात आहे. यादरम्यानच अर्जुन कपूर हा भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यात स्पॉट झाला. या सामन्यात तो थेट साहिबा बाली हिच्यासोबत दिसला. ज्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. या चर्चांवर अजून अर्जुन कपूर याने काहीच भाष्य केले नाही. मात्र, अर्जुन कपूर जरी माैन बाळगूण असला तरीही साहिबा हिने यावर भाष्य केले. अर्जुन कपूर याच्यासोबतचा फोटो शेअर करत तिने म्हटले की, प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका…
अर्जुन कपूर मलायका अरोरा हिला सोडून डेट करत असलेली साहिबा बाली नक्की कोण आहे, यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. 5 डिसेंबर 1994 मध्ये काश्मीरी परिवारात तिचा जन्म झाला. दिल्लीच्या विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. वाणिज्यमध्ये तिची पदवी आहे. विद्यापीठाच्या शिक्षणानंतर तिने यूकेत पुढील शिक्षण घेतले. अगोदर ती मार्केटिंगचे काम करत. झोमॅटोसोबत तिने कामही केले.
त्यानंतर तिने अभिनयामध्ये करिअरला सुरूवात केली. चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांच्यासोबत तिने कामाला सुरूवात केली. बार्ड ऑफ ब्लड, अमर सिंह चमकीला सारख्या चित्रपटात तिने काम केले. अर्जुन कपूर याच्या बर्थडेनिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली होती. अर्जुन कपूरला विश करत तिने खास फोटोही शेअर केला.तेव्हापासूनच अर्जुन कपूरसोबत तिचे नाव जोडले जातंय.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या वयात मोठे अंतर होते. दोघे एकमेकांना डेट करत होते. अनेकांनी त्यांच्या वयावरही भाष्य केले. दोघे एकत्रच राहत होते. मात्र, अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा या रंगताना दिसल्या. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर एकमेकांसोबत स्पॉट होताना दिसले नाही. आता हा फोटो पाहून अर्जुन आणि साहिबा एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट आहे.