Shut Up Ya Kunal | संजय राऊतांनी 'शट अप'चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण

'संजय राऊत यांनी 'शटअप या कुणाल'च्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून येण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरु करेन' असं ट्वीट कुणाल कामराने केले आहे.

Shut Up Ya Kunal | संजय राऊतांनी 'शट अप'चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण

मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केलं आहे. संजय राऊतांनी निमंत्रण स्वीकारले, तरच या कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु करेन, असं कुणाल कामरा म्हणतो. त्यामुळे ‘सामना’च्या निमित्ताने मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे राऊत आता मुलाखत देताना दिसणार का, याची उत्सुकता लागली आहे. (Stand Up Comedian Kunal Kamra invites Shivsena MP Sanjay Raut for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्वीट कुणाल कामराने केले आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. देवेंद्र फडणवीसांसोबत नुकतीच झालेली भेट असो, किंवा अभिनेत्री कंगना रनौतसोबत त्यांचे उडालेले खटके, सातत्याने चर्चेत असलेल्या राऊतांची मुलाखत घेण्याचा मोह कुणाला कामराला झाल्याचे दिसत आहे.

नेटिझन्समध्ये कुणाल कामरा चर्चेत

‘शट अप या कुणाल’ हा कुणाल कामराच्या मुलाखतींचा कार्यक्रम नेटिझन्समध्ये लोकप्रिय आहे. त्याने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने पहिल्या सिझनला सुरुवात झाली होती. (Stand Up Comedian Kunal Kamra invites Shivsena MP Sanjay Raut for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या असे नेते सहभागी झाले आहेत.

राज ठाकरेंनाही दिलेले निमंत्रण

याआधी कुणाल कामराने राज ठाकरेंनाही ‘शट अप या कुणाल’साठी आवताण दिले होते. “मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील किर्ती वड्याचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. म्हणून मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे. जेणेकरुन तुम्ही माझ्या ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल.” असे कुणालने काही महिन्यांपूर्वी ट्वीट केले होते,

संबंधित बातम्या :

‘लाच’ देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा

(Stand Up Comedian Kunal Kamra invites Shivsena MP Sanjay Raut for interview in Shut Up Ya Kunal Season 2)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *