Rang Maza Vegla  | ‘कुणीतरी येणार गं…’, इनामदारांच्या कुटुंबात रंगणार दीपाच्या डोहाळेजेवणाचा सोहळा!

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) ही मालिका अधिक पसंत केलेई जात आहे. आगळी वेगळी कथा आणि हटके मांडणी यामुळे ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेत लवकरच दीपा (Deepa) अर्थात इनामदारांच्या सुनेच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

Rang Maza Vegla  | ‘कुणीतरी येणार गं...’, इनामदारांच्या कुटुंबात रंगणार दीपाच्या डोहाळेजेवणाचा सोहळा!
रंग माझा वेगळा मालिका

मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) ही मालिका अधिक पसंत केलेई जात आहे. आगळी वेगळी कथा आणि हटके मांडणी यामुळे ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेत लवकरच दीपा (Deepa) अर्थात इनामदारांच्या सुनेच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, असं म्हणतात. मातृत्वासारखं दुसरं सुख नाही. दीपाला लहानपणापासूनच आईचं प्रेम मिळालं नाही. त्यामुळे आता दीपा स्वतःच्या पदरी पडलेलं हे सुख पाहून हरखून गेली आहे (Star Pravah Rang Maza Vegla serial upadate deepa baby shower ceremony).

लहानपणीच आई गमावली, त्यामुळे राधा अर्थात ‘सावत्र आई’ला आपली आई मानत तिने ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या पदरी नेहमीच उपेक्षा पडली. त्यात कृष्ण वर्णामुळे हुशार असणाऱ्या दीपाची नेहमीच जगाने थट्टा केली. मात्र, त्यानंतर तिच्या आयुष्यात कार्तिक आला आणि तिचा सर्वस्व झाला. अशक्य वाटत असणारी प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यात शक्य होत गेली.

कार्तिकच्या वागण्याने दीपा तणावात

आता तर दीपाला मातृत्वाचं सुखही मिळणार आहे. मात्र, आनंदाच्या या काळात दीपाला कार्तिकची साथ मिळत नाहीय. श्वेता आणि तिच्या राधा आईच्या कटकारस्थानामुळे कार्तिकच्या मनात दीपाविषयी शंका निर्माण व्हायला लागल्या आहे. तो दीपावार संशय देखील घेऊ लागला आहे. दीपावर प्रचंड प्रेम करणारा, तिचा वर्ण न पाहता मनाची निर्मळता पाहून तिची साथ देणारा कार्तिक सध्या तिचा तिरस्कार करू लागला आहे. कार्तिकच्या विचित्र वागण्यामुळे दीपा सध्या प्रचंड तणावात आहे. त्यामुळे डोहाळ जेवणाचा कार्यक्रमात नेमकं काय नाट्य घडणार याची उत्सुकता आहे (Star Pravah Rang Maza Vegla serial upadate deepa baby shower ceremony).

डोहाळेजेवणासाठी सजला इनामदारांचा वाडा

डोहाळ जेवणाच्या या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात मात्र सध्या जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. हिरवी साडी आणि पारंपरिक फुलांच्या दागिन्यांमध्ये दीपाचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. मात्र, या डोहाळे जेवणाच्या सोहळ्यातच दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात आणखी एक नवं वळण येणार आहे. या कथेत आता पुढे नेमकं काय घडणार?, याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

टीआरपीत अव्वल!

वेगळ्या धाटणीची ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका सध्या रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. यातील ‘डॉ. कार्तिक’, ‘दीपा’, ‘सौंदर्या इनामदार’, ‘श्वेता’, ‘आदित्य’, ‘राधाआई’ ही सगळीच पात्र रसिक प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहेत. याचमुळे ही मालिका सध्या खूप पाहिली जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत देखील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका पहिल्या पाचात आपले स्थान टिकवून आहे.

(Star Pravah Rang Maza Vegla serial upadate deepa baby shower ceremony)

हेही वाचा :

Apurva Nemlekar | ‘या स्त्रीनं माझं आयुष्य बदललं…’ म्हणत ‘या’ व्यक्तीला यशाचं श्रेय देतेय अपूर्वा नेमळेकर!

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI