Apurva Nemlekar | ‘या स्त्रीनं माझं आयुष्य बदललं…’ म्हणत ‘या’ व्यक्तीला यशाचं श्रेय देतेय अपूर्वा नेमळेकर!

‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे म्हणत ‘शेवंता’ साकारणाऱ्या अपूर्वाने तिच्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला या यशाचे श्रेय देऊ केले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:23 AM, 9 Apr 2021
Apurva Nemlekar | ‘या स्त्रीनं माझं आयुष्य बदललं...’ म्हणत ‘या’ व्यक्तीला यशाचं श्रेय देतेय अपूर्वा नेमळेकर!
अपूर्वा नेमळेकर

मुंबई : छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’चे (Ratris Khel Chale 3) तिसरे पर्व सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच सगळ्या कलाकारांची अर्थात त्यांच्या पात्रांची एंट्री झाली होती. मात्र, प्रेक्षक वाट बघत होते ती त्यांच्या लाडक्या ‘शेवंता’ची! अखेर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता आता या मालिकेत भुताच्या रूपाने का होईना पण अण्णांसोबत ‘शेवंता’ची (Shevanta) देखील एंट्री झाली आहे. नुकताच एक खास फोटो शेअर करत अपूर्वाने (Apurva Nemlekar) देखील तिचे आभार मानले आहेत (Ratris Khel Chale 3 Shevanta Fame actress Apurva Nemlekar Share special photo social media).

‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे म्हणत ‘शेवंता’ साकारणाऱ्या अपूर्वाने तिच्या आयुष्यातल्या खास व्यक्तीला या यशाचे श्रेय देऊ केले आहे. बरं ही खास व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द ‘शेवंता’ आहे.

अपूर्वाचे खास फोटोसेशन

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. इतकेच नव्हे तर, नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील अपूर्वाने असेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अपूर्वाने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. काळेभोर केस मोकळे सोडत तिने स्वतःच्या मोबाईलमधूनच हे फोटो क्लिक केले आहेत.

पाहा अपूर्वाची पोस्ट

 (Ratris Khel Chale 3 Shevanta Fame actress Apurva Nemlekar Share special photo social media)

या फोटोंपैकी एका फोटोला तिने, ‘धीस लेडी चेंज माय लाईफ’ अर्थात ‘या स्त्रीने माझे आयुष्य बदलले’, असे खास कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोमध्ये नीट निरखून पाहिल्या अपूर्वाच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती दिसून येते. अपूर्वाच्या या फोटोत मागील भिंतीवर ‘शेवंता’ची काही स्केच फ्रेम करून लावलेली आहे. अर्थात ‘शेवंता’ बनून अपूर्वा घराघरांत पोहोचली आहे. त्यामुळेच तिने तिच्या या यशाचे श्रेय ‘शेवंता’ या पात्राला दिले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाला उदंड प्रतिसाद!

22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता!

सुरुवातीला कोकणची बदनामी होते म्हणून मालिकेला विरोध झाला. पण जसजसे कथानक पुढे सरकत गेले, तसतसा हा विरोधही मावळत गेला. पहिल्या पर्वामध्ये पहिल्याच भागात अण्णा गेले, असे दाखवले आणि कथानक पुढे नेले होते. पण दुसऱ्या पर्वामध्ये मात्र अण्णांचा पूर्ण जीवनपटच दाखवला होता. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच लोकांनी कार्यक्रमाला डोक्यावर घेतले होते. त्यामुळे आत तिसऱ्या पर्वाकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.

(Ratris Khel Chale 3 Shevanta Fame actress Apurva Nemlekar Share special photo social media)

हेही वाचा :

‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना

Ratris Khel Chale 3 | रघु काकांचा ‘रघु महाराज’ अवतार शेवंता संपवणार? मालिकेत पुन्हा एकदा येणार मोठा ट्विस्ट!