
मुंबई : आपल्या चाहत्यांना पोटधरून हसवणारे फेमस कॉमेडियन सुदेश लहरी (Sudesh Lehri) हे नेहमीच चर्चेत असतात. विशेष म्हणजे सुदेश लहरीची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. नेहमीच सुदेश लहरी हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून असतात. सुदेश लहरी हे फक्त काॅमेडियनच नाही तर एक जबरदस्त असे अभिनेते देखील आहेत. मात्र, सुदेश लहरी यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त वाईट काळ हा बघितला आहे. सुदेश लहरी यांच्या घरी एक वेळ जेवण्याचे पैसे देखील नसायचे.
सुदेश लहरी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुदेश लहरी आपल्या जुन्या दिवसाची आठवण करताना दिसत आहेत. सुदेश लहरी यांनी या व्हिडीओमध्ये मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे सुदेश लहरी यांचे बोलणे हे सर्वांनाच आवडले देखील आहे. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सुदेश लहरी यांच्या व्हिडीओमध्ये त्यांच्यासमोर खूप मोठ्या ट्रॉफी दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सुदेश लहरी म्हणाले की, एक वेळ अशी होती की, माझ्याकडे या ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा नव्हती. आता मी नव्या घरात शिफ्ट झालो आहे आणि आता माझ्याकडे या ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा देखील आहे. आता या ट्रॉफी स्वच्छ करून शोकेशमध्ये ठेवणार आहे.
पुढे सुदेश लहरी म्हणाले, एकेकाळी माझ्या घरी एक वेळेचे जेवण तयार होईल इतके अन्न नसायचे आणि पैसे देखील नसायचे. पैस नाही पण मी घरी ट्रॉफी घेऊन येत होतो. एकदा एक व्यक्ती माझ्या घरी आली आणि त्यांनी सांगितले की, तुमचा सन्मान करण्यात येणार आहे आणि तुम्हाला आम्ही ट्रॉफी देणार आहोत.
यावेळी मी त्या व्यक्तीला म्हणालो की, मला ट्रॉफी ऐवजी तुम्ही पैसे द्या. तो व्यक्ती म्हणाला की, असे शक्य नाही. मी त्याला म्हटलो की, मला पैशांची गरज आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. मग मी त्या व्यक्तीला माझ्या घरातील एक ट्रॉफी कशामध्ये तरी गुंडाळून दिली आणि त्याला म्हटले की, स्टेजवर तुम्ही हिच ट्रॉफी म्हणून मला द्या.
एका ट्रॉफीची किती किंमत असते. त्या व्यक्तीने उत्तर दिले 300 ते 400 ते पैसे मला द्या. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने माझी ती गोष्ट ऐकली आणि मला पैसे दिले. मी जेंव्हा पण घरी येत असत, माझे मुले मला म्हणायचे की, पप्पा या ट्रॉफी कशाला घेऊन येतात, यापेक्षा आम्हाला कधी टॉफिया पण घेऊन येत जा. आता सुदेश लहरी यांचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.