कपिल शर्माच्या पुनरागमनाची तारीख ठरली

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. नुकताच लग्नबेडीत अडकलेला कपिल त्याच्या सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वासोबत टीव्हीवर रिएंट्री घेणार आहे. या शोचा पहिला भाग येत्या 29 डिसेंबरला सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी ‘सिंबा’ सिनेमाची संपूर्ण टीम पहिल्याच शोमध्ये दिसणार आहे. या भागाचा प्रोमो सध्या सोशल […]

कपिल शर्माच्या पुनरागमनाची तारीख ठरली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. नुकताच लग्नबेडीत अडकलेला कपिल त्याच्या सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वासोबत टीव्हीवर रिएंट्री घेणार आहे. या शोचा पहिला भाग येत्या 29 डिसेंबरला सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी ‘सिंबा’ सिनेमाची संपूर्ण टीम पहिल्याच शोमध्ये दिसणार आहे. या भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये, अभिनेता रणवीर सिंह कपिलला त्याच्या नवीन शोसाठी शुभेच्छा देतो आणि म्हणतो की, ‘आम्ही एक वर्ष तुला खूप मिस केलं. कुटुंबाला जोडून ठेवण्याचं काम तुझ्या शोने केलं, तुझ्या या नव्या पर्वासाठी तुला खूप खूप शुभेच्छा.’

या शोमध्ये सिंबा सिनेमाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीही आले होते. ते म्हणाले, ‘मागील वर्षी ‘गोलमाल अगेन’ने बंपर कमाई केली होती, त्याप्रमाणेच ‘द कपिल शर्मा शो’चं दुसरं पर्वही खूप यशस्वी होईल.’

कपिल शर्मा हा मागील एका वर्षापासून टीव्हीपासून दूर होता. अनेक वादांमुळे त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चा पहिला सीझन बंद करावा लागला होता. त्यानंतर अनेकांनी असे तर्क लावले होते की, आता कपिल शर्मा कधीही पुनरागमन करु शकणार नाही. तसेच मध्यंतरी तो तणावाखाली असल्याचंही वृत्त होतं, मात्र या सर्वांना खोटं ठरवत तो पुन्हा एकदा आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना हसवणार आहे.

या शोच्या पहिल्या भागात रणवीर सिंह आणि रोहित शेट्टीसोबतच सारा अली खान आणि सोनू सूदही दिसणार आहेत.

कपिल शर्मा हा 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथ सोबत विवाहबंधनात अडकला. हा विवाह सोहळा कपिलच्या होमटाऊन जालंधर येथे पंजाबी पद्धतीने पार पडला. कपिलच्या लग्नाला टीव्ही जगातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली, यात कपिलच्या जवळच्या मित्रमंडळींचा समावेश होता. कपिलच्या लग्नाला अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, कॉमेडीयन कृष्‍णा अभिषेक, कॉमेडीयन सुदेश लहरी, कॉमेडीयन भारती सिंह यांची विशेष उपस्थिती होती. लग्नापूर्वी झालेल्या विधींनाही हे सर्व उपस्थित होते.

कपिल आणि गिन्नीने ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी सोमवारी मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली. जेडब्ल्यू मॅरेट येथे या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला बॉलीवुड ते टीव्ही जगतातील अनेकांनी हजेरी लावली.

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.