अमिताभ बच्चन यांच्या नातूकडून सुहाना खानला फ्लाइंग किस; व्हिडीओ पाहून चकीत झाले चाहते

अगस्त्याची आई श्वेतालाही या नात्याविषयी आधीच माहिती होती, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर श्वेताला आधीपासूनच सुहाना आवडायची, असंही समजतंय. त्यामुळे तिच्याकडून दोघांच्या रिलेशनशिपला हिरवा कंदील आहे.

अमिताभ बच्चन यांच्या नातूकडून सुहाना खानला फ्लाइंग किस; व्हिडीओ पाहून चकीत झाले चाहते
Suhana Khan and Agastya Nanda
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 29, 2023 | 3:22 PM

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत समाविष्ट असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. मात्र त्याआधीच तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. पापाराझींची तिच्यावर खास नजर असते. तर दुसरीकडे सुहाना तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळेही चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. आता या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.

तान्य श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीला बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सनी हजेरी लावली होती. तान्या ही सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीची गर्लफ्रेंड आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुहानाने ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे. पार्टीमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. पार्टीनंतर तिला गाडीपर्यंत सोडण्यासाठी तान्या आणि अगस्त्य बाहेर येतात. यावेळी जेव्हा सुहाना जाऊ लागते, तेव्हा अगस्त्य तिला फ्लाइंग किस देताना दिसतो.

हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर चाहत्यांमध्ये अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं एकमेकांचे चांगले मित्र असतील, असं काहींनी म्हटलंय. तर काहींनी त्यांच्या डेटिंगचा अंदाज वर्तवला आहे. सुहाना खान, आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा यांच्यात लहानपणापासूनच चांगली मैत्री आहे. अनेकदा हे चौघं एकत्र दिसतात. इतकंच नव्हे तर सुहाना आणि अगस्त्य हे जोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. सेटवरही दोघं एकमेकांसोबत बराच वेळ घालवायचे. इतरांपासूनही ही गोष्ट लपली नव्हती. ख्रिसमस पार्टीच्या निमित्ताने अगस्त्याने कुटुंबीयांसमोर हे नातं ‘ऑफिशिअल’ करण्याचं ठरवलं होतं, अशीही चर्चा होती.

अगस्त्याची आई श्वेतालाही या नात्याविषयी आधीच माहिती होती, असं म्हटलं जातंय. इतकंच नव्हे तर श्वेताला आधीपासूनच सुहाना आवडायची, असंही समजतंय. त्यामुळे तिच्याकडून दोघांच्या रिलेशनशिपला हिरवा कंदील आहे. मात्र या सर्व चर्चांवर अद्याप सुहाना किंवा अगस्त्याकडून दुजोरा मिळालेला नाही.

काही काळापूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा यांचंही नाव जोडलं गेलं होतं. हे दोघं एकाच शाळेत शिकायचे. मात्र नव्याने नंतर स्पष्ट केलं की दोघं चांगले मित्र आहेत.

झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमधील तीन स्टार किड्स पदार्पण करणार आहेत. सुहाना खान , श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे यातून पदार्पण करत आहेत.