सुलक्षणा पंडित यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? 16 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या आणि…

Sulakshana Pandit Death : अत्यंत वेदनादायी होता सुलक्षणा पंडित यांचा अंत, शेवटच्या क्षणी कशी होती त्यांची अवस्था? जवळच्या व्यक्तीने सांगितलं, '16 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या आणि...' सिनेविश्वावर शोककळा...

सुलक्षणा पंडित यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? 16 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या आणि...
फाईल फोटो
Updated on: Nov 08, 2025 | 2:08 PM

Sulakshana Pandit Death : प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका सुलक्षणा पंडित यांचं 6 नोव्हेंबर रोजी कार्डियक अरेस्टने त्यांचं निधनं झालं आहे. सुलक्षणा पंडित प्रसिद्ध अभिनेत्री विजयता पंडित यांची बहीण आणि मेवती घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांची भाची होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुलक्षणा पंडीत यांची अवस्था शेवटच्या क्षण फार वाईट होती. त्या कोणाला ओळखू देखील शकत नव्हत्या… संजीव कुमार यांनी एकदा सुलक्षणा पंडित यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला, त्यानंतर त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. बहीण विजयता पंडित यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत त्यांची शेवटच्या क्षणी कशी अवस्था होती… याबद्दल सांगितलं आहे.

विजयता पंडित यांनी एका मुलाखतीत तिची बहीण सुलक्षणा पंडितच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितलं. ‘सुलक्षणा दीदी माझ्या दुसऱ्या आई प्रमाणे होत्या… कंबरेला झालेली दुखापत आणि अनेक शस्त्रक्रियांमुळे त्या 16 वर्ष अंथरुणाला खिळून होत्या. मी आणि माझ्या कुटुंबियांनी त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा केली… आम्ही फक्त घरातील एक सदस्य नाही तर, एक उत्तम गायिका आणि अभिनेत्रीला गमावलं आहे. ज्यांनी त्यांच्या काळात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केलं…’

सांगायचं झालं तर, सुलक्षणा पंडित त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. संजीव कुमार यांच्यासोबत अफेअर आणि लग्नाच्या मागणीच्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र सुरु होत्या. पण संजीव यांनी सुलक्षणा यांच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला… ज्यामुळे सुलक्षणा यांनी कधीच लग्न केलं नाही. तर संजीव हे देखील अविवाहित राहिले… सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे सुलक्षणा यांनी देखील त्याच दिवशी अखेरचा श्वास घेतला ज्या दिवशी संजीव यांचं स्मृतीदीन होतं…

विजयता पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संजीव कुमार यांच्या स्मृतीदिनीला सुलक्षणा यांचं निधन झालं हे विडंबन नाही का? त्यांच्यातील खोल नातेसंबंध आणि त्यांच्यावरील तिच्या प्रेमाबद्दल सर्वांना माहिती आहे…’ सांगायचं झालं तर, संजीव कुमार यांचं निधन 6 नोव्हेंबर 1985 रोजी झालं होतं…’

सुलक्षणा पंडित यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, प्लेबॅक सिंगर म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही… गायन विश्वात स्वतःचं नाव मोठं केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला… सुलक्षणा यांनी ‘संकोच’, ‘हेराफेरी’, ‘अपनापन’, ‘खानदान’ आणि ‘वक्त की दीवार’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली…