.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sumbul Touqeer चे वडील दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे अभिनेत्रीची होणारी आई?

'बिग बॉस १६' फेम सुम्बुल तौकीर हिचे वडील लवकरच दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात; वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य...

Sumbul Touqeer चे वडील दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; कोण आहे अभिनेत्रीची होणारी आई?
| Updated on: Jun 09, 2023 | 1:50 PM
Share

मुंबई : लोकप्रिया टीव्ही अभिनेत्री सुम्बुल तौकीर कायम तिच्या वडिलांबद्दल सांगत असते. सुम्बुल आणि वडिलांचं नातं फार खास आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘बिग बॉस १६’ आणि ‘इमली’ मालिकेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सुम्बुलचे वडील लवकरच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. सुम्बुल आणि तिची बहीण सानिया यांनी वडिलांना पुन्हा लग्न करण्यासाठी तयार केलं आहे. अभिनेत्रीचे वडील तौकीर खान पुढच्या आठवड्यात निलोफर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. निलोफर यांना देखील एक मुलगी आहे. सध्या सुम्बुलच्या घरात वडिलांच्या लग्नाची तयारी सुरु आहे. सध्या सर्वत्र सुम्बुल हिच्या वडिलांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वडिलांच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सुम्बुल म्हणाली, ‘आम्ही प्रचंड आनंदी आहोत. आमच्या कुटुंबात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या वडिलांच्या पत्नीसोबत एक बहीण देखील आमच्या आयुष्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘गेल्या काही वर्षांपासून वडिलांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे. आज आम्ही जे काही करु शकलो, ते फक्त वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे करु शकलो. सानिया आणि मी वडिलांच्या नव्या आयुष्यासाठी आनंदी आहोत.. कुटुंबाचे वरिष्ठ इकबाल हुसैन खान यांनी वडिलांच्या लग्नासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे… त्यामुळे मी त्यांचे आभार मानते..’

सुम्बुल तौकीर बिग बॉस 16 मध्ये दिसली होती. वडिलांच्या लग्नाशिवाय आणखी एका महत्त्वाच्या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.. ‘इमली’ फेम अभिनेत्री फहमन खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. यावर एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही चांगले मित्र आहोत..’ शिवाय रंगणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘असं काही नाही.. आमच्यामध्ये सर्वकाही ठिक आहे…’

सुम्बुल लवकरच ‘सिंगल’मध्ये दिसणार आहे. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “आगामी गाणं बहीण, बाबा आणि माझ्यासाठी खूप खास आहे आणि आम्ही त्यावर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सनाया आणि मी ते गायले आहे. गाणं तयार आहे. आता आम्ही शूटिंगच्या प्रतीक्षेत आहोत.. असं देखील अभिनेत्री म्हणाली..

Follow Us
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक