
हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गोविंदा आज चित्रपटांमध्ये कमी दिसतो, पण एक काळ असा होता जेव्हा जवळपास त्याने बॉलिवूडवर राज्य केलं. त्याच्या अभिनयावर आणि नृत्यावर चाहते घायळ असायचे. आजही, जेव्हा जेव्हा त्याची गाणी कुठेही वाजवली जातात तेव्हा चाहते त्याच्यासोबत स्टेप्स जुळवू लागतात. गोविंदा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. मग ती चर्चा त्याच्या अफेअरची असो किंवा मग त्याची पत्नी सुनीता आहुजासोबतच्या वादांबद्दल असो. सुनीता तिच्या स्पष्टवक्त्यासाठीही ओळखली जाते. तसेच सुनीता जेवढी धार्मिक आहे तेवढीच तिला जगण्याचा आनंद घ्यायलाही आवडतं. तिला दारू खूप आवडते. तिने हे अनेक मुलाखतींमध्ये अगदी बिनधास्त पणे तिची ही आवड सांगितली आहे.
सुनीताला का आवडते एवढी दारू?
सुनीता आहुजाने एका मुलाखतीत तिच्या आवडत्या गोष्टींबद्दल सांगताना तिने सांगितले की ब्लू लेबल ही तिची आवडती दारू आहे. जेव्हा जेव्हा ती आनंदी असते तेव्हा ती दारू पिते. सुनीता म्हणाली की काही दिवसांपूर्वी जेव्हा तिचा मुलगा यश लाँच झाला तेव्हा तिला खूप आनंद झाला की तिने एकटीने संपूर्ण बाटली संपवली. सुनीताच्या मते, जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असतो तेव्हा ती संपूर्ण बाटली संपवते. ती म्हणते की ती दररोज दारू पीत नाही. ती फक्त रविवारीच पिते. तो दिवस तिचा एन्जॉय डे असतो.
‘रात्री 8 वाजले की मी दारूची बाटली उघडते…’
त्याच संभाषणात सुनीता आहुजाला हेही विचारण्यात आलं होतं की ती तिचा वाढदिवस कसा साजरा करते, तेव्हा सुनीता म्हणाली की ती तिच्या वाढदिवसाला स्वतःसोबत वेळ घालवते. तिने असेही म्हटले की तिने तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या मुलांची काळजी घेण्यात घालवले. पण आता ते मोठे झाले आहेत म्हणून आता सुनीताला स्वतःसोबत वेळ घालवायला आवडते. सुनीता म्हणाली की, “मी एकटीच बाहेर जाते. कधी देवीच्या मंदिर तर कधी गुरुद्वारामध्ये जाऊन येते. मग रात्री 8 वाजले की मी दारूची बाटली उघडते, केक कापते आणि एकटीच दारू पिते. माझा वाढदिवस साजरा करते.”
दरम्यान मध्ये मध्ये सुनीता गोविंदाच्या वादाच्या किंवा एकत्र न राहण्याच्या तसेच घटस्फोटाच्या चर्चा येतच असतात. पण त्या सर्व चर्चांना किंवा बातम्यांना सुनीताने नेहमीच टाळलं आहे. त्या सर्व अफवा असल्याचंही तिने म्हटलं आहे.