विवाहित सनी देओलचं डिंपलशी होतं अफेअर, सेटवर दोघं बिनधास्त..; अभिनेत्रीकडून पोलखोल

बॉलिवूड इंडस्ट्रीत काही जोड्यांची जोरदार चर्चा झाली. मात्र त्यांची प्रेमकहाणी पूर्ण होऊ शकली नाही. अशीच एक जोडी म्हणजे सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांची. विवाहित असतानाही सनी देओल डिंपलच्या प्रेमात पडला होता.

विवाहित सनी देओलचं डिंपलशी होतं अफेअर, सेटवर दोघं बिनधास्त..; अभिनेत्रीकडून पोलखोल
सनी देओल, डिंपल कपाडिया आणि सनी देओलची पत्नी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 17, 2024 | 3:45 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीत एकेकाळी अभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. या दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चाहत्यांना खूप आवडायची. पण त्याचसोबत त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा चित्रपटाच्या सेटवर चर्चेचा विषय ठरायची. सनी आणि डिंपलने ‘मंजिल मंजिल’, ‘नरसिम्हा’, ‘आग का गोला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. चित्रपटात काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी सनी देओल विवाहित होता. पूजासोबत त्याचं लग्न झालं होतं. या दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुलं होती. सनी आणि डिंपल या दोघांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने त्यांच्या अफेअरचा खुलासा केला आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सुजाता मेहता म्हणाली, “सनी आणि डिंपल यांच्यात ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त होती. मी दोघांसोबत एका चित्रपटात काम केलंय. त्यांनी सेटवर कधीच अफेअर लपवण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही सर्वजण आपापलं काम करून निघून जायचो. पण सेटवर सनी आणि डिंपल एकमेकांसोबत बिनधास्तपणे वागायचे. हे सर्व त्यांच्या नशिबातच लिहिलेलं होतं. त्यांचं एकमेकांच्या जवळ येणं हे ठरलेलंच होतं.”

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची एकेकाळी जोरदार चर्चा होती. 80 च्या दशकात सनी आणि डिंपलच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. राजेश खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर डिंपल आणि सनी देओल यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. जेव्हा डिंपलची बहीण सिंपल कपाडियाचं निधन झालं, तेव्हासुद्धा सनी देओल तिला सावरताना दिसला होता. जवळपास 11 वर्षे दोघांनी एकमेकांना डेट केल्याचं म्हटलं जातं.

सनी देओलने 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पूजाशी लग्न केलं. या चित्रपटात त्याने अमृता सिंहसोबत काम केलं होतं. सनी आणि पूजा यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी करण देओलने काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड दृशा आचार्यशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.