स्टेजवर येताच डोळ्यात पाणी अन् चेहऱ्यावर…;धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर सनी देओलचा शुटिंगचा पहिला दिवस; ‘बॉर्डर 2’चा टीझर लाँच कार्यक्रम

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी देओल 'बॉर्डर 2' च्या टीझर लाँच कार्यक्रमात भावूक झालेला दिसला. वडिलांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरे गेला. पण त्याने वैयक्तिक आयुष्यातील दुःख बाजूला ठेवून कामावर परतण्याचा निर्णय घेत त्याने अभिनेता म्हणून त्याचे कर्तव्यही पार पाडले.

स्टेजवर येताच डोळ्यात पाणी अन् चेहऱ्यावर...;धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर सनी देओलचा शुटिंगचा पहिला दिवस; बॉर्डर 2चा टीझर लाँच कार्यक्रम
Sunny Deol Emotional at Border 2 Teaser Launch
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 16, 2025 | 7:53 PM

अभिनेता सनी देओलने नवीन वर्षाची त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे “बॉर्डर 2” ची घोषणा. ‘बॉर्डर 2’चा टीझर 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्यासाठी मुंबईत एक भव्य टीझर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “बॉर्डर 2” च्या टीझर लाँचमध्ये सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन एकत्र दिसले. या अभिनेत्यांचे चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या टीझरला प्रेक्षकांचाही तेवढाच प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या टीझर लाँचच्या वेळी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि स्टार कास्ट उपस्थित होते. सनी देओल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी पुन्हा एकदा कामावर परतला हे पाहून सर्वांना समाधानही वाटत होतं.पण सनीचे मात्र अश्रू थांबले नाही. कार्यक्रमात तो भावूक झालेला दिसला.

सनीने “बॉर्डर 2” चित्रपटातील एक दमदार संवादही स्टेजवर सादर केला. चित्रपटातील तो सिग्नेचर डायलॉग म्हणजे “आवाज कहाँ तक जान चाहिए… लाहोर तक”.पण हा डायलॉग बोलताना तो भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तसेच सनी देओलने ज्या ताकदीने हा संवाद म्हटला ते पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला होता. तथापि, त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून चाहते भावनिक होत आहेत.

वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरे गेला आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःख बाजूला ठेवून कामावर परतला आहे. पण त्याच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या वेदना आणि वडिलांची आठवण डोळ्यातील पाण्यामुळे नक्कीच लक्षात येते. वडिलांच्या निधनाचे दुःख सनीच्या डोळ्यात अजूनही स्पष्ट दिसत होते.


टीझर लाँच कार्यक्रमात वरुण धवनने देखील त्याचं मत व्यक्त केलं. तो स्टेजवर चढताच त्याने सनी देओलचे पायाला स्पर्श करत त्याचे आशीर्वाद घेतले. हे पाहून चाहत्यांना देखील वरुणचे कौतुक वाटले. वरुण म्हणाला, “ही माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. हा माझ्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे. मला चंदन सिनेमात ‘बॉर्डर’ चित्रपट पाहिल्याचे आठवते. मी सनी सरांना चित्रपटात पाहिले होते. मी कधीही विचार केला नव्हता की मी त्यांच्यासोबत चित्रपट करेन, मी ‘बॉर्डर 2’ करेन. यासाठी मी सनी सरांचे आभार मानू इच्छितो.” असे म्हणत त्याने आनंद अन् समाधान व्यक्त केलं.

“बॉर्डर 2” चित्रपटात सनी देओल, अहान शेट्टी , दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत आहेत. “बॉर्डर 2” पुढील वर्षी 23 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.