AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Died : धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब, 2 पत्नी, 6 मुले आणि 13 नातवंडे, दोन मुली दिल्ली तर नातवंडे…

Dharmendra Funeral : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या निधनाची अफवा देखील सुरू होती.

Dharmendra Died : धर्मेंद्र यांचं बॉलिवूडमधील सर्वात मोठं कुटुंब, 2 पत्नी, 6 मुले आणि 13 नातवंडे, दोन मुली दिल्ली तर नातवंडे...
dharmendra family
| Updated on: Nov 24, 2025 | 2:36 PM
Share

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांच्या तब्येलबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसल्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा सुरू होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट दिली. मोठा चाहतावर्ग त्यांचा आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरात आता चाहत्यांची मोठी गर्दी जमत आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असताना संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. बॉलिवूडमधील सर्वात मोठे कुटुंब धर्मेंद्र यांचे आहे. धर्मेंद्र यांना दोन पत्नी असून 6 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नावे प्रकाश काैर आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी आहे.

प्रकाश काैर आणि धर्मेंद्र यांना चार मुले तर हेमा मालिनी यांना 2 मुले आहेत. 6 मुले तर 13 नातवंडे असा मोठा परिवार धर्मेंद्र यांचा आहे. वडिलांची तब्येत नाजूक असल्यापासून त्यांचे 6 लेकर त्यांच्या जवळ होती. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या आहेत. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरशी पहिले लग्न केले. त्यांना चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल ही नावे आहेत.

धर्मेंद्र यांची मुलगी विजेता पती विवेक गिलसोबत दिल्लीत राहते. विजेताचे पती विवेक गिल हे राजमकल होल्डिंग्ज अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. विवेक आणि विजेता यांचे लग्न 1988 रोजी झाले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. ईशा देओल हिने आई वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केले. मात्र, धर्मेंद्र यांची दुसरी मुलगी चित्रपटांपासून दूर आहे. तिचे नाव अहाना आहे.

बॉबी देओल आणि सनी देओल हे दोघेही बॉलिवूडमध्ये काम करतात. हे दोघे ईशा देओलचे सावत्र भाऊ आहेत. मागील काही दिवसांपासून बॉबी देओल, सनी देओल आणि ईशा देओल यांच्यातील जवळीकता वाढल्चाचे बघायला मिळाले. सनी देओल आणि बॉबी देओल यांच्या दोन्ही बहिणी प्रसिद्धीपासून दूर आहेत. आता धर्मेंद्र यांच्या नातवड्यांनीही बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.