AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान माझी मावशी..; सनी देओलच्या वक्तव्यावर चिडले चाहते, म्हणाले ‘प्रदर्शनापूर्वीच जागृत होतं प्रेम’

'बंटवारा 1947' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अभिनेता सनी देओलने पाकिस्तानबद्दल जे वक्तव्य केलं, ते ऐकून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. भारत माझी आई आहे, तर पाकिस्तान माझी मावशी, असं त्याने म्हटलंय.

पाकिस्तान माझी मावशी..; सनी देओलच्या वक्तव्यावर चिडले चाहते, म्हणाले 'प्रदर्शनापूर्वीच जागृत होतं प्रेम'
Sunny Deol Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2026 | 2:56 PM
Share

अभिनेता सनी देओल सध्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रविवारी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जेव्हा सनीला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेते आणि वडील धर्मेंद्र यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. “जर भारत माझी आई असेल तर पाकिस्तान माझी मावशी आहे”, असं सनी देओल म्हणाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्याचसोबत या कार्यक्रमात सनी देओलने राजकारणाशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

सनीने सर्वप्रथम हे स्पष्ट केलं की ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचं शूटिंग पाकिस्तानमध्ये नाही तर भारतातच झालं आहे. तो म्हणाला, “या चित्रपटाचं शूटिंग तिथे नाही, तर हिंदुस्तानातच झालं आहे. हा संपूर्ण देश एकच होता. जसं पापा (धर्मेंद्र) म्हणायचे की, ही माझी आई आहे, तर ती माझी मावशी आहे. ही गोष्ट तर तुम्हाला खूप चांगल्याप्रकारे माहीत आहे. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या बाबतीत एकमेकांशी जोडलेलो आहोत. मला प्रत्येकाच्या तपशिलात जायचं नाही, पण आम्ही कलाकार आहोत, आम्ही निर्माते आहोत. आम्ही कथा निवडतो आणि त्या बनवतो. आम्ही त्यांना राजकीय रंग देत नाही आणि आम्हाला तसं करायचंही नाही. त्यामुळे मी प्रत्येकाबद्दल बोलणार नाही.”

पहा व्हिडीओ-

पाकिस्तानला मावशी म्हटल्याने सनी देओलवर नेटकऱ्यांकडून जोरदार टीका होत आहे. ‘तो खरंच बोलतोय, संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करणारी मावशी आहे ती’, असं एकाने म्हटलंय. तर ‘चित्रपटाचं प्रदर्शन जवळ येताच यांचं शेजारच्या देशांवरील प्रेम जागृत होतं’, असा टोला दुसऱ्याने लगावला आहे. ‘चित्रपटाची विक्री करण्यासाठी ही नवी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर सनी देओल आणि प्रिती झिंटा एकत्र काम करत आहेत. याशिवाय यामध्ये शबाना आझमी, अली फजल आणि अभिमन्यू सिंह यांच्याही भूमिका आहेत. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट 16 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा