लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर

बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलच्या लोकसभेतील अनुपस्थितीमुळे सध्या चर्चेत आहे. पंजाबच्या गुरदासपूरमधून सनी देओल भाजपकडून खासदार म्हणून निवडून आला.

Sunny Deol, लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात सनी देओल 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) लोकसभेतील अनुपस्थितीमुळे सध्या चर्चेत आहे. पंजाबच्या गुरदासपूरमधून सनी देओल भाजपकडून खासदार म्हणून निवडून आला. पण लोकसभेत सनी देओल गैरहजर असल्याचे समोर आलं आहे.

सनी देओल (Sunny Deol) लोकसभेतील पहिल्या अधिवेशनात 37 दिवसांपैकी 28 दिवस गैरहजर होता. पावसाळी अधिवेशनाचे दिवस वाढवल्यानंतर सनी देओल सलग पाच दिवस अधिवेशनाला उपस्थित राहिला. यानंतर संपूर्ण एक आठवडा गैरहजर होता.

पावसाळी अधिवेशनात सनीने फक्त 9 बैठकांमध्ये सहभाग घेतला होता. नुकतेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी खासदारांना लोकसभेत वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. पण तरीही सनी देओलच्या या गैरहजरीमुळे मोदी किंवा अमित शाह काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर सनी पंजाबमधील गुरदासपूर या मंतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा राहिला. त्याने काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांचा 82 हजार 459 मतांनी पराभव केला.

याआधीही बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर राज्यसभेत अनेकदा गैरहजर राहिले होते. तेव्हाही अनेकांनी त्यांच्या गैरहजरीवर प्रश्न उपस्थित केले होते.

सनीच्या लोकसभेतील अनुपस्थितीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही वर्ष सनी देओल चित्रपटसृष्टीत काम करताना दिसत नाही. सध्या त्याच्या मुलगा करण देओलचा नवा चित्रपट येत आहे. या चित्रपटात सनी व्यस्त असल्याचे बोललं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *