AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rajinikanth Net Worth | ‘थलाइवा’ नादच नको! , सुपरस्टार रजनीकांत यांची संपत्ती पाहून चकीत व्हाल

सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.

Happy Birthday Rajinikanth Net Worth | 'थलाइवा' नादच नको! , सुपरस्टार रजनीकांत यांची संपत्ती पाहून चकीत व्हाल
rajinikanth
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 12, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आजही त्यांचे काम इतरांना प्रेरीत करते. सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्सच्या यादीत त्याचा समावेश आहे. करोडोंमध्ये फी घेणाऱ्या रजनीकांतकडे खूप आलिशान घरे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात किती आहे त्यांचे नेट वर्थ

जाणून घ्या नेट वर्थ  कॅकनॉलेज या वेबसाईटच्या अहवालानुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती 365 कोटी आहे. आपल्या संपत्ती पैकी बसाचा भाग रजनीकांत दान करतात. रजनीकांत यांची अजून एक खासीयत आहे ती म्हणजे जर त्यांचा कोणताही चित्रपट फ्लॉप झाला तर तो त्याची फी निर्मात्याला परत करतात. वेबसाइटनुसार, रजनीकांत एका चित्रपटासाठी 50 कोटी रुपये घेतात.

रजनीकांत यांचे घर रजनीकांत यांचे चेन्नईमध्ये एक आलिशान घर आहे. हे घर त्यांनी 2002 मध्ये बांधले होते. रजनीकांत यांचे घर खूप आलिशान आहे आणि त्यांनी त्याचे घर प्राचीन वस्तूंनी घर सजवले आहे.

रजनीकांतच्या गाड्या रजनीकांत यांना गाड्यांचा छंद नाही पण त्यांच्या कड 3 गाड्या आहेत त्यामध्ये टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर आणि बेंटले यांचा समावेश आहे.

गुंतवणूक कॅकनॉलेजच्या रिपोर्टनुसार, रजनीकांत यांची 100-120 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. रजनीकांत यांनी 1975 मध्ये तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी अनेक तामिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. यानंतर 1982 मध्ये रजनीकांत यांनी अंधा कानून या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटात रजनीकांतसोबत हेमा मालिनी आणि रीना रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित काही दिवसांपूर्वी  रजनीकांत यांना इंडस्ट्रीतील त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

संबंधीत बातम्या :

Happy Birthday Rajinikanth | बस कंडक्टरच नाही तर कधीकाळी कुली म्हणूनही काम केलं, ‘या’ व्यक्तीमुळे रजनीकांत मनोरंजन विश्वात आले!

उत्कंठावर्धक गूढ रहस्यमय घटना,‘शांती भवन’मधील गूढ रहस्य उलगडण्यासाठी अभिनेत्री लीना भागवत सज्ज!

Happy Birthday Umesh Kamat | दोघांच्या वयात जास्त अंतर म्हणून लग्नाचा निर्णय लांबणीवर, अशी होती प्रिया-उमेशची लव्हस्टोरी!

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक