कडक भाऊ! डोळ्यांवर गॉगल अन् डोक्यावर गांधी टोपी; सूरजचा सलमान खानच्या गाण्यावर स्वॅग

बिग बॉस मराठी 5 चे विजेता सूरज चव्हाणचे सलमान खानच्या गाण्यावर केलेलं रील सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या रीलमध्ये सूरजचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळतोय.

कडक भाऊ! डोळ्यांवर गॉगल अन् डोक्यावर गांधी टोपी; सूरजचा सलमान खानच्या गाण्यावर स्वॅग
Suraj Chavan
| Updated on: Nov 03, 2024 | 6:24 PM

‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाणचं आयुष्यचं आता बदलून गेलं आहे. बिग बॉसच्या घरात असताना सूरजने कलाकारांसह सर्व अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं. बिग बॉसच्या प्रवासानंतर सूरजने पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियावर पहिल्यासारखेच रिल आणि व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली आहे. आताही त्याचा असच एक रिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

सूरज चव्हाणचे नवीन रील व्हायरल 

सूरज चव्हाणचे डायलॉग जसे फेमस आहेत तसेच त्याची डान्स करण्याची स्टाईलही खूप फेमस झाली. इंस्टाग्रामवर सूरज त्याचे डान्स रिल्सच्या माध्यमातून शेअर करत असतो. बिग बॉसनंतर फरक फक्त एवढाच झाला आहे की त्याच्या व्हिडीओ आधी फक्त ट्रोलिंग आणि खिल्ली उडवणाऱ्या कमेंट येत असतं पण आता मात्र त्याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून लाईक्स अन् चाहत्यांचे प्रेम, प्रोत्साहन मिळताना दिसतं.

बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज सोशल मीडियावर पुन्हा ॲक्टिव्ह झाला असून नवनवीन व्हिडीओ तो शेअर करताना दिसतो. सूरजचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये त्याचा एक वेगळाच स्वॅग दिसून येत आहे.

सलमान खानच्या गाण्यावर स्वॅग

सूरजने सलमान खानच्या ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर रील बनवलं आहे. या गाण्यावर त्याचा वेगळीच स्टाईल आणि स्वॅग दिसून येत आहे. डोळ्यांवर गॉगल अन् डोक्यावर गांधी टोपी घालून सूजरने या गाण्यावर फुल्ल ऑन कल्ला केला आहे. या व्हिडीओला नेटक्यांनी पसंत केले असून त्यावर भरभरून कौतुकाच्या कमेंटस् केल्या आहेत आणि त्याला प्रोत्साहनही दिले आहेत.


कॉमेडी व्हिडीओ आणि डान्समुळे मिळाली होती प्रसिद्धी

बिग बॉसमध्ये जाण्याआधी सूरजला कॉमेडी व्हिडीओंमुळे आणि त्याच्या झापुकझापूक स्टाईलच्या डान्समुळे प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता तो बॉलिवूडच्या ट्रेंडिंग गाण्यांवर व्हिडीओ बनवताना दिसत आहे. सूरजच्या व्हिडीओंना तेवढा प्रतिसादही नेटकऱ्यांकडून आता मिळत आहे.