AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

51 व्या वर्षी अभिनेत्याचं पुन्हा लग्न; मुलांसमोर घेतल्या लग्नाच्या शपथा, नेटकरी म्हणाले ‘जोडी असावी तर अशी’

सूर्या आणि ज्योतिका यांनी त्यांच्या लग्नाच्या विसाव्या वाढदिवशी पुन्हा एकदा विवाहाच्या शपथा घेतल्या. या सोहळ्याचे खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

51 व्या वर्षी अभिनेत्याचं पुन्हा लग्न; मुलांसमोर घेतल्या लग्नाच्या शपथा, नेटकरी म्हणाले 'जोडी असावी तर अशी'
सूर्या, ज्योतिकाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2026 | 12:45 PM
Share

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांनी त्यांच्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त एक खास आणि भावनिक क्षण चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लग्नाला दोन दशकं पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी पुन्हा एकदा विवाहाच्या शपथा घेतल्या. विशेष म्हणजे या खास सोहळ्याला त्यांची मुलं दिया आणि देव, कुटुंबीय तसंच जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सूर्या आणि ज्योतिका यांनी 2006 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन दशकांच्या प्रवासानंतर दोघांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित करण्यासाठी विवाहाच्या शपथा घेण्याचा निर्णय घेतला. परदेशातील एका चर्चमध्ये हा खास सोहळा पार पडल्याचं समोर आलं आहे. यावेळी ज्योतिका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत होती, तर सूर्या पांढरा कोट आणि काळ्या रंगाच्या पँटमध्ये दिसला. या सोहळ्यात दोघांची मुलं दिया आणि देवही सहभागी झाले होते. सूर्या याचा भाऊ आणि अभिनेता कार्ती तसंच कुटुंबातील इतर सदस्य आणि जवळचे मित्रही या खास प्रसंगी उपस्थित होते. ज्योतिका आपल्या मुलासोबत आयलमधून चालत येतानाचा क्षण आणि तिला पाहून सूर्या भावूक झाल्याचं दृश्य व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Jyotika (@jyotika)

या खास सोहळ्याबद्दल ज्योतिकाने सोशल मीडियावर भावनिक पोस्टही शेअर केली. तिच्या मते हा सोहळा केवळ एका ‘परिपूर्ण’ वैवाहिक आयुष्याचा उत्सव नव्हता. उलट, गेल्या वीस वर्षांतील प्रेम, मतभेद, एकमेकांना समजून घेणं, तडजोडी, त्याग आणि नि:स्वार्थ प्रेम या सगळ्यांचा हा उत्सव होता. ज्योतिकाने तिच्या शपथांमध्ये आनंदी राहण्यासोबतच आयुष्यातील अपूर्णता स्वीकारण्याचा उल्लेख केला. आपल्या मुलांबद्दल कृतज्ञ असल्याचंही तिने म्हटलं आहे.

सूर्या आणि ज्योतिकाने या सोहळ्याला ‘द सिकल’ असं नाव दिलं आहे. दोन दशकांचा संसार, त्यातील चढ-उतार आणि एकत्र केलेला प्रवास यानंतर नव्याने घेतलेल्या या शपथांमुळे त्यांचा खास दिवस आणखी संस्मरणीय झाला. सूर्या आणि ज्योतिका यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1999 मध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला वेगळं वळण मिळालं. 2006 मध्ये त्यांनी लग्न केलं. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील 20 वर्षांचा हा खास टप्पा आता या भावनिक सोहळ्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?