National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील सूर्या-ज्योतिकाचा ‘तो’ फोटो का होतोय व्हायरय?

पत्नी ज्योतिकासोबत साऊथ सुपरस्टार सूर्याचे फोटो व्हायरल

Sep 30, 2022 | 7:39 PM
स्वाती वेमूल

|

Sep 30, 2022 | 7:39 PM

68वा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यातील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साऊथ सुपरस्टार सूर्या आणि बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात सूर्याने पत्नी ज्योतिकासोबत हजेरी लावली. या दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

1 / 5
सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात या दोघांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी सूर्याने पारंपरिक पोशाख लुंगीला प्राधान्य दिलं. या दोघांनी नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 5
सूर्याला 'सूराराई पोट्रू' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार सोहळ्यातील दोघांचे फोटो पाहून 'पॉवर कपल' अशा शब्दांत नेटकरी कौतुक करत आहेत.

3 / 5
1999 मध्ये 'पूर्वेल्लम केत्तुप्पर' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर शूटिंगनिमित्त दोघांची एकमेकांशी भेट होत राहिली. हळूहळू दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

4 / 5
सूर्या आणि ज्योतिकाने 11 सप्टेंबर 2006 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी जवळपास सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. त्यांना दिया ही मुलगी आणि देव हा मुलगा आहे. सोशल मीडियावर या जोडीचे फोटो नेहमीच व्हायरल होतात.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें