AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतर मोठं सत्य समोर; रिया चक्रवर्तीने सांगितलेली ‘ती’ घटना म्हणजे…

sushant singh rajput : सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतर समोर आलेली 'ती' घटना अत्यंत भयानक... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रिया चक्रवर्ती हिच्या वक्तव्याची चर्चा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत सिंह राजपूत याची चर्चा...

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या 4 वर्षांनंतर मोठं सत्य समोर; रिया चक्रवर्तीने सांगितलेली 'ती' घटना म्हणजे...
| Updated on: Jan 09, 2024 | 8:28 AM
Share

मुंबई | 9 जानेवारी 2024 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याला चाहते विसरु शकलेले नाहीत. आजही सुशांत याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील सुशांत याच्याबद्दल मोठी गोष्ट समोर आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने अभिनेता क्लॉस्ट्रोफोबिया नावाच्या आजाराचा सामना करत असल्याचं सांगितलं होतं. पण तेव्हा सुशांत याला कोणताही आजार नव्हता असं अंकिका लोखंडे हिने सांगितलं होतं.  अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने ‘बिग बॉस 17’ मध्ये सुशांत याला क्लॉस्ट्रोफोबिया हा आजार होता… ही गोष्ट मान्य केली आहे.

दरम्यान, सुशांत यांच्या निधनानंतर जेव्हा रिया हिने अभिनेत्याच्या आजाराबद्दल सांगितलं होतं, तेव्हा अंकिता हिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सुशांत विमान चालवताना दिसत आहे. सुशांत याच्या निधनानंतर अंकिता हिने व्हिडीओ पोस्ट केला होता. तेव्हा रिया हिच्या वक्तव्यावर अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, सध्या सर्वत्र अंकिता लोखंडे हिच्या वक्तव्याची चर्चा रंगत आहेत. ‘बिग बॉस 17’ मध्ये सुशांत क्लॉस्ट्रोफोबिया या आजाराचा सामना करत होता… असं वक्तव्य अंकिता हिने केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर देखील नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये अंकिता कायम सुशांत याच्याबद्दल सांगत असते. सुशांत याच्यासोबत असलेल्या अनेक आठवणी अंकिता बिग बॉसमध्ये सांगताना दिसते. ज्यामुळे अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात येतं. फक्त प्रसिद्ध आणि लोकप्रियतेसाठी सुशांत याच्यानावाचा वापर करते… असं अनेक जण म्हणतात. अंकिता आणि सुशांत यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं आहे. दोघांच्या लग्नाच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही…

क्लॉस्ट्रोफोबिया आजार

क्लॉस्ट्रोफोबियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला बंद किंवा लहान ठिकाणी गेल्यावर गुदमरल्यासारखं आणि चिंताग्रस्त वाटू लागतं. फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापासून लिफ्ट वापरण्यापर्यंत त्यांच्यामध्ये अस्वस्थता असते. यामुळे आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना थरकाप, अस्वस्थता, मळमळ आणि चक्कर येणं जाणवू लागतं.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

सुशांत सिंह राजपूत याने 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र मोठी खळबळ माजली होती. सुशांत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. सुशांत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत, पण सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक चर्चा सुरु असतात.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.