अभिनेता – क्रिकेटरला केलं डेट, मॅनेजरसोबत खास नातं, १० अफेअर्स; लग्न न करताच अभिनेत्री झाली आई

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लग्न न करताच झाली आई.. एक दोन नाही तर, १० सेलिब्रिटींसोबत तिचे प्रेमसंबंध... आजही बॉलिवूडवर करते राज्य...

अभिनेता - क्रिकेटरला केलं डेट, मॅनेजरसोबत खास नातं, १० अफेअर्स; लग्न न करताच अभिनेत्री झाली आई
| Updated on: Jul 03, 2023 | 4:27 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कायम त्यांच्या लव्ह लाईफ आणि ब्रेकअपमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आजपर्यंत लग्न केलं नाही. संपत्ती, पैसा, प्रसिद्धी असूनही अभिनेत्रींनी एकटं राहण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं काहीही नाही. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, तिने एक दोन नाही तर, चक्क १० सेलिब्रिटींना डेट केलं आहे. कधी अभिनेते तर, कधी क्रिकेटर… एवढंच नाही तर, अभिनेत्री मॅनेजरच्या देखील प्रेमात अडकली होती. आज अभिनेत्री ४७ वर्षांची झाली आहे. पण ती आपल्या सौंदर्य आणि  फिटनेसने फक्त चाहत्यांना नाही तर, अनेक सेलिब्रिटींना देखील घायाळ करते…

एक दोन नाही तर, चक्क १० जणांना डेट करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सुष्मिता सेन आहे. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. पण २०२१ मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला. पण ब्रेकअपनंतर देखील दोघे अनेकदा एकत्र दिसले. रोहमन शॉल याच्यासोबत ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर सुष्मिता हिचं नाव उद्योजक ललित मोदी याच्यासोबत जोडण्यात आलं.

ललित मोदीसोबत खासगी फोटो आणि रोहमन शॉल याच्यासोबत  ब्रेकअपमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. पण आता रोहमन शॉल आणि सुष्मिता सेन यांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. एका मुलाखतीत देखील रोहमन शॉल याने सुष्मिता हिच्यासोबत असलेल्या नात्यावर स्पष्ट भूमिका मांडली..

रोहमन शॉल म्हणाला, ‘सुष्मिताने काहीही केलं तरी ती माझ्यासाठी खास आहे. तिच्या जवळ असते, तेव्हा मला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आम्ही सोबत चांगले दिसतो. आम्ही लोकांसाठी जगत नाही. कोणी काय विचार करतं या गोष्टीचा आम्हाली काहीही फरक पडत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होण्याची गरज नाही…’ असं देखील सुष्मिता हिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल म्हणाला.

रोहमन शॉल, ललित मोदीच नाही तर, सुष्मिताने अभिनेता रणदीप हुड्डा याला देखील जवळपास तीन वर्ष डेट केलं असल्याच्या तुफान चर्चा रंगल्या. शिवाय अभिनेत्रीच्या नावाची चर्चा मानव मेनन, पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम, दिग्दर्शक मुदस्सर अजीज, विक्रम भट्ट यांच्यासोबत देखील झाली.

अनेक सेलिब्रिटींसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा झाली. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. शिवाय अभिनेत्रीने जीवनात कधी लग्नाचा विचार देखील केला नाही. सुष्मिता हिने २००० साली मोठी मुलगी रिनी हिला दत्तक घेतलं. तेव्हा रिनी फक्त आणि फक्त ६ महिन्यांची होती. अभिनेत्रीची दुसरी मुलगी अलीसा आता १३ वर्षांची आहे. अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. एवढंच नाही तर, सुष्मिताच्या मोठ्या मुलीने अभिनय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे.